रामायण मालिकेचे रोचक किस्से जे खूप कमी लोकांना माहिती आहेत
सध्या देशात लॉकडाऊन चालू असल्यामुळे कोणत्याही शो किंवा सिनेमाचं शूटिंग बंद आहेत. यानिमित्ताने दूरदर्शनच्या सुवर्ण दिवसांचे (सॅटेलाइट चॅनलच्या काही दिवस आधी) सर्व शो पुन्हा या चॅनलवर प्रसारित होत आहेत. ३३ वर्षांनंतरही रामानंद सागर यांच्या रामायणांचा विशेष उत्साह आहे. पण भारतीय टीव्हीच्या इतिहासात घडलेल्या डझनभर रेकॉर्ड्समुळे या शोची सुरुवात खूप कठीण झाली. त्यात रामायण आता संपत आले आहे . पण लॉकडाऊन मध्ये ७.७ कोटी लोकांनी रामायण बघितले आणि या सिरीयल ने भारतातील सर्व सिरीयल TRP चे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
या सिरीयल बद्दलचे दहा किस्से जे खूप कमी लोकांना माहिती आहे :
१) रामायण सिरीयल हि भारतातील पहिली धार्मिक सिरीयल होती .
२) या सिरीयल मधील अभिनेते बाल धुरी (दशरथ) आणि जयश्री गडकर (कौशल्या) हे खऱ्या जीवनात देखील नवरा बायको आहेत.
३) अभिनेता मुलराज राजदा (जनकराजा ) हे समीर राजदा (क्षत्रूगुण ) चे खऱ्या आयष्यात वडील आहेत.
४) यातील बरेचशे कलाकार जसे अरुण गोविल, दीपिका चिखलीया ,सुनील लहरी आणि अरविंद त्रिवेदी यांनी रामायणाच्या आधी रामानंद सागर यांच्या विक्रम वेताळ या सिरीयल मध्ये काम केले आहे.
५) या सिरियल मध्ये सर्वात आधी रामाच्या रोल साठी अभिनेता जितेंद्र आणि सीतेच्या रोल साठी श्रीदेवी ला विचारणा करण्यात आली होती पण काही कारणांमुळे ते शक्य होऊ शकले नाही.
६) रामायणामध्ये दारा सिंगने हनुमानाची भूमिका साकारली. रामानंद सागर यांनी त्यांना रोल देऊ केला तेव्हा त्यांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करत काम करण्यास नकार दिला. पण रामानंद सागर यांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही तेव्हा दारासिंग साहेबांनी पूर्णवेळ या मालिकेत काम केलं. हनुमानाच्या रोलमध्ये ते इतके रमले होते की, शूटिंग संपेपर्यंत चिकन-मटन जेवण त्याने सोडून दिलं होतं.
७) रामायण १९८७-१९८८ मध्ये प्रसारित करण्यात आले. मुंबईपासून सुरतपर्यंत ७८ एपिसोडचं शूटिंग सुरू होतं. सीरियलच्या सेटवर त्या काळात आजच्या सारख्या सुविधा नव्हत्या. विशेष म्हणजे वॉशरूमची तरतूदही फारशी चांगली नव्हती. अनेक सीरियल कलाकारांना दिवसभर पाणीसुद्धा प्यायला भेटायचे नाही. लक्ष्मणची भूमिका साकारणारा सुनील लखारी म्हणतो, “गावात अनेक दृश्यं शूट झाली होती. आमच्यापैकी अनेकजण पाणी पीत नव्हते कारण त्यांना पाणी प्यायल्यावर त्यांना वॉशरूममध्ये जावे लागले.
८) दीपिका चिखलिया (सीता ) फक्त २२ वर्षांची होती.
९) सर्वप्रथम दुरदर्शन ने रामानंद सागर यांची हि रामायण मालिकेला दूरदर्शन वर चालवण्यास नकार दिला होता पण जेव्हा त्याकाळचे पंतप्रधान राजीव गांधींना रामानंद सागर च्या या रामायणाच्या कल्पनेबद्दल कळलं तेव्हा त्यांनी दूरदर्शन ला ही सिरीयल चालवायला आदेश दिले. अश्या प्रकारे रामायण लोकांसमोर आल.
१०) रामायण सिरीयल मुळे त्याकाळी कलर टीव्ही खरेदी करण्याकडे लोकांचा ओघ वाढला. एका रिपोर्टनुसार त्याकाळी ४ कोटी कलर टीव्ही विकल्या गेले होते.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम