सोन्याविषयी “या” गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
लक्ष्मीपूजन असो वा घरच्या लक्ष्मीची मागणी, सोन्याशिवाय हे सण अपूर्ण आहेत. पण सोनं नेमकं आलं कुठून?आणि आपल्या आयुष्यात सोन्याचं महत्व वाढलं आहे का ?दसरा असो, धनत्रयोदशी असो वा अक्षय्य तृतीया, सोनं खरेदीसाठी हे विशेष निमित्तच म्हणा.
दक्षिण आफ्रिका आणि भारतापाठोपाठ उत्तर अमेरिकेमध्ये सोन्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील खाणींत बरंच सोनं सापडतं.
जगात सर्वात जास्त सोन कुठे आहे ?
विटवॉटर्सरँड खोऱ्यातून जगाला सर्वांत जास्त सोनं मिळतं. आणि या खोऱ्याच्या 40 टक्के भागात अजूनही उत्खनन झालेलं नाही.सोन्याची जगातली दुसरी सर्वांत मोठी खाण भारतात आहे, जी दक्षिण कर्नाटकमध्ये कोलार जिल्ह्यात आहे.जगात सर्वांत जास्त सोनं दक्षिण आफ्रिका आणि भारतात आढळतं. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जगातली सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे.
भारतात सर्वात जास्त सोनं कुठे सापडत ?
2001 मध्ये कर्नाटकातील कोलार खाण बंद करण्यात आली. जगात सोन्याच्या मोठ्या खाणींपैकी ती दुसऱ्या नंबरची खाण होती. भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी आहेत – कर्नाटकाच्या हुट्टी आणि उतीमध्ये आणि झारखंडच्या हिराबुद्दिनी इथं.गेल्या काही वर्षांपासून या तीनही खाणींमधलं उत्खनन कमी झालं आहे. त्यामुळे भारताला आता सोनं आयातीवर अवलंबून राहावं लागतं.2003 पासून कोलारमधील ही खाण जरी बंद असली तरी सोन्याच्या उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरामधल्या सोन्याचा साठा सर्वश्रूत आहे. गेल्या वर्षी तिरुपती बालाजी मंदिरानं 1,311 किलो सोनं पंजाब नॅशनल बँकेत जमा केलं होतं.
भारतात सर्वांत जास्त सोनं मंदिरांमध्ये आहे. केरळच्या तिरुवनंथपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिरात नेमकी किती धन आहे, याचा नेमका अंदाज अजून कोणालाच नाही.पण 2011 मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा मंदिराचा खजिना उघडला गेला त्यात सोन्याच्या मूर्ती, भांडी, दागिने, नाणी आणि मौल्यवान रत्नं सापडली.
सरकारन एवढ सोन कुठे ठेवल आहे ?
भक्तांच्या दानातून खासगी सोनं जसं मंदिरांमध्ये जमा होतं तसं सरकारकडून सर्वांत जास्त सोनं बँकांच्या लॉकर्समध्ये साठवलं जातं.आकडेवारीनुसार भारताकडे तब्बल 600 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं आहे. आणि भारत सरकारने यातला मोठा भाग नागपूरच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात साठवला आहे. 1956 साली भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या परवानगीनंतर मुंबई ऑफिसमधून लष्कराच्या कडक सुरक्षेत देशाचं सोनं नागपूरला नव्या तिजोरीत हलवलं.तेव्हापासून आजपर्यंत भारत सरकारचं सोनं हे परकीय आक्रमणांना लक्षात घेऊन नागपूरमध्येच ठेवण्यात आलं आहे.
भारतात हि जगातील सोन्याची मोठी बाजारपेठ आहे
भारताची सोनं उत्पादन क्षमता जरी कमी असली तरी जास्तीत जास्त सोनं आयात करून आणि त्याची विक्री करुन भारत जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ बनला आहे.भारत जगातील सोन्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारतात सर्वांत जास्त दागिने विकले जातात. भारतात सोन्याला भावनिक महत्त्व आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक पटीनं भारतात सोनं विकलं जातं.
भारतात सोन्याकडे फक्त गुंतवणूक म्हणून बघितलं जात
युरोपात आणि अमेरिकेत सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं आणि म्हणून नाणी किंवा बिस्किटांच्या स्वरुपात सोनं साठवलं जातं. सोनं म्हटलं की फक्त दागिने आठवत असले तरी जगभरात जास्तीत जास्त सोनं हे नाणी आणि बिस्किटांच्या स्वरुपात साठवलं जातं. भारतात सोन्याकडे फक्त गुंतवणूक म्हणून बघितलं जात नाही. त्यामुळे भारतात सोनं जास्त प्रमाणात दागिन्यांच्या स्वरुपात साठवलं जातं.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम