Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा एक महिला पंतप्रधान नेहरूंची कॉलर पकडते, तेव्हा…

0

आजच्या घडीला पंतप्रधान किंवा त्यांचे मंत्री यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचे मोठे कवच असते. पण पूर्वीच्या काळी एवढी सुरक्षा नसायची. पंडित नेहरू पंतप्रधान असतानाही सुरक्षा कवच सोबत घेवून फिरायचे नाहीत.

त्यातूनच एक किस्सा घडला कि, जेव्हा एका महिलेने पंतप्रधान नेहरूंची कॉलर पकडली होती.

किस्सा स्वातंत्र्यानंतरचा आहे. पंतप्रधान नेहरू आपल्या गाडीतून संसद भवनात पोहचले. नेहरू गाडीतून बाहेर येताच, एका महिलेने नेहरूंची कॉलर पकडली

आणि म्हणाली, “भारत स्वतंत्र झाला, तू देशाचा पंतप्रधान झाला, पण मला म्हातारीला काय मिळालं ?”

यावर नेहरूंचे उत्तर होते, “तुम्ही आता देशाच्या पंतप्रधानाची कॉलर पकडून उभे आहात. तुम्हाला हे मिळालं”

असं सांगितले जाते कि खर तर त्या वेळी ती महिला राम मनोहर लोहियांच्या सांगण्यावरून नेहरूंकडे गेली होती. पण पंतप्रधान नेहरूंच्या आयुष्यातील असे अनेक घटना आहेत, ज्याच्या मधून लोकशाहीवरील त्यांच्या विश्वासाला उजाळा देतात.

असाच अजून एक प्रसंग १९३७ सालचा आहे.

देशात स्वातंत्र्य चळवळ जोरात चालू होती. कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून नेहरू तिसऱ्यांदा निवडले गेले होते आणि देशात त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत होती.

याच काळात कोलकाता येथून प्रकाशित होत असलेल्या ‘मॉडर्न रिव्यू’ या मासिकात एक लेख प्रकाशित झाला. लेखाचे नाव होते ‘राष्ट्रपती’ आणि लेखकाचे नाव होते चाणक्य.

लेखात असे म्हटले होते की “लोक ज्या प्रकारे नेहरूंना स्वीकारत आहेत त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी अशी भीती आहे की कदाचित ते हुकूमशहा बनतील. म्हणून नेहरूंना थांबवले पाहिजे. ते महत्त्वाचे आहे.”

लेखाच्या शेवटी असे म्हटले होते की, “वी वान्ट नो सीज़र्स”.

त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर त्यातील सत्य बाहेर आले. चाणक्य या नावाने लेख दुसरे कोणीच नसून स्वतः नेहरूंनीच त्या नावाने लेख लिहला होता. त्याला कारण म्हणजे त्यांना वाटू लागले होते की ज्या प्रकारे भारतीय लोक त्याला पाहू लागली आहे. त्यामुळे ते हुकूमशहा होण्याचा धोका आहे.

अमेरिकन पत्रकार नॉरमन कजिन्स यांनी एकदा नेहरूंना विचारले की तुम्ही कोणता वारसा मागे ठेवून जावू इच्छिता. यावर नेहरूंनी उत्तर दिले होते, “40 कोटी भारतीय ज्यांना स्वतःचे राज्य कसे चालवावे हे माहित आहे.”

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.