Take a fresh look at your lifestyle.

जगातील पहिला फोटो कसा काढला होता ?

नेहमी सतत आपल्या आठवणी ताज्या ठेवणारा हा कॅमेरा कधी, कसा आणि कुणी केला माहिती आहे का?

0

आजकल डीएसएलआर हाती आला कि कोणीही स्वत:ला फोटोग्राफर समजतो. मात्र एक फोटोग्राफर होणे म्हणजे काय? तसेच आज जागतिक फोटोग्राफी दिवस का साजरा केला जातो, हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.

कॅमेरा हा मानवाचा तिसरा डोळा म्हणून ओळखला जातो. सध्या जवळपास प्रत्येकाकडे चांगल्या दर्जाचे कॅमेरे आहेत. प्रत्येक क्षण टिपण्यासाठी आपण कॅमेऱ्याचा वापर करत असतो.

नेहमी सतत आपल्या आठवणी ताज्या ठेवणारा हा कॅमेरा कधी, कसा आणि कुणी केला माहिती आहे का?

तर जाणून घेऊयात जगातील पहिल्या कॅमेऱ्याबद्दल…

जगातील पहिला कॅमेरा

कॅमेर्‍याचं तंत्र तसं फार जुनं. कॅमेरा ऑब्स्कुरा या नावाने ओळखलं जाणारं तंत्र प्राचीन चीन आणि ग्रीक लोकांनी विकसित केलं होतं.कॅमेरा ऑब्स्कुरा याचा पाहिला शोध अभ्यासक इब्न-अल-हज़ैन यांनी लावला. यांच्यानंतर ब्रिटिश अभ्यासक राबर्ट बॉयल आणि त्यांचे सहकार्यी रॉबर्ट हुक यांनी १६६० मध्ये पोर्टेंबल कॅमेरा विकसित केला.

एका खोली एवढा मोठा होता आकार

तर १६८५ मध्ये जोहन जान याने असा कॅमेरा तयार केली ज्यामध्ये चांगले छायचित्र टिपण्यात येत होते. तयार करण्यात आलेल्या या कॅमेऱ्याचा आकार एका खोली एवढा मोठा होता जिथे एक किंवा दोनच व्यक्ती जावु शकत होती.

यात भिंग वापरून वा छिद्राच्या साह्याने बाहेरील प्रतिमा कॅमेर्‍यात पाडण्यात येत असे. हा कॅमेरा अगदी एखाद्या खोलीइतका मोठा असायचा आणि एक-दोघे त्यात सहज करू शकत.

कॅमेर्‍यानं काढलेला फोटो डेव्हलप करता येऊ शकणारा आणि वाहून नेता येण्यासारख्या लहान आकाराचा कॅमेरा यायला मात्र १८३९ उजाडावं लागलं. आता डीएसएलआर चा जमाना आहे आणि त्यातही थेट वायरलेस यंत्राला जोडता येऊ शकणारे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत.

जगातील पहिला फोटो

आजकाल छान फोटो दिसला की लगेच शटरस्पीड, एक्स्पोजर वगैर शंका यायला लागतात आणि नवा डीएसएलआर खरेदी केलेल्यांचा उत्साह तर विचारू नये. पण सुरवातीच्या काळात कॅमेर्‍याचं वजनच इतकं असे की ते सगळं गैरसोईचं होई.

हा वरचा जगातील काही पहिल्या फोटोपैकी असलेला फोटो आहे १८२६ किंवा २७ साली काढलेला ’ल ग्रास’ येथील एका खिडकीतून दिसणार्‍या दृश्याचा. फोटो डेव्हलप लरण्याचा पहिला अर्धवट यशस्वी प्रयत्न १८१६ मध्ये फोर नेप्से या शास्त्राज्ञाने केला होता.

पुढे साधारण १८३९पर्यंत तंत्र आणखी सुधारल्यानंतर फोटो तुलनात्मकरित्या अधिक काढले जाऊ लागले.

म्हणून आज साजरा केला जातो जागतिक छायाचित्र दिन

आज 19 ऑगस्ट. जगभरात आजचा दिवस हा जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो.

आज पासून अंदाजे 177 वर्षा आधी म्हणजेच 1839 साली फ्रान्समध्ये छायाचित्रणाची प्रथम सुरूवात झाली.

19 ऑगस्ट रोजी फ्रान्सने छायाचित्रणाच्या अविष्काराला मान्यता दिली होती म्हणूनच हा दिवस छायाचित्र दिन रूपात साजरा केला जातो. त्यामुळे व्यावसायिक आणि सर्व हौशी छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा!

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.