Take a fresh look at your lifestyle.

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर फिक्स आहे. ते म्हणजे इलॉन मास्क.

0

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर फिक्स आहे. ते म्हणजे इलॉन मास्क.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेणार, असं जाहीर केल्यापासून त्यांची नव्याने चर्चा सुरु झाली होती. तशी चर्चा अनेक दिवस सुरू होती. शेवटी इलॉन मस्क यांनी ट्विटर 44 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय आकड्यात विचार केला तर जवळपास तीन लाख 37 हजार कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.

ट्विटर विकत घेतल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी निणर्य घ्यायला सुरु केले, त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर नव्याने चर्चा सुरु झाल्यात. त्यात एका दिवशी शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणे असो किंवा ट्विटर ब्लु टिकसाठी महिन्याला चार्ज सुरु करणे असो. ट्विटरच्या या खरेदीमुळे इलॉन मस्क पहिल्यांदा चर्चेत आलेत असं नाही. याआधीही अनेक कारणांमुळे ते कायम चर्चेत असतात.

पण सध्या आम्ही तुम्हाला इलॉन मस्क यांच्या आयुष्यातील इंटरेस्टिंग फॅक्ट बद्दल सांगणार आहोत. ज्याच्या बद्दल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

वयाच्या 10 व्या वर्षापासून इलॉन मस्क कम्प्युटर आणि व्हिडिओ गेम्समध्ये इंटरेस्ट होता. वयाच्या 12 व्या वर्षी, त्याने एक व्हिडिओ गेम तयार केला होता, जो नंतर त्यांनी एका मासिकाला 500 डॉलर मध्ये विकला. या स्पेस फायटिंग गेमचे नाव ब्लास्टर होते.

त्यांनतर मस्क यांनी त्यांचा भाऊ किम बॉल सोबत झिप-2 नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. पुढे तीही कंपनी त्यांनी 22 दशलक्ष डॉलर्सना कॉम्पॅक नावाच्या कंपनीला विकली.

1999 मध्ये, इलॉन मस्क सुमारे 1 कोटी डॉलर्सची गुंतवणुक करून ‘X.com’ नावाची वेबसाईट सुरु केली. पुढे ती कॉन्फिनिटी नावाच्या कंपनीत मर्ज झाली. जे आता PayPal म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. 2002 मध्ये, eBay या कंपनीने ने 150 कोटी डॉलरला PayPal विकत घेतले.

त्यानंतर मस्क यांनी अवकाश संशोधनाच्या तंत्रज्ञानावर काम सुरू केले. 2002 मध्ये यासाठी ‘स्पेस-एक्स’ नावाची कंपनी सुरु केली. येत्या काही दिवसांत या कंपनीच्या माध्यमातून ते माणसाला इतर ग्रहांवर पाठवू शकतील, असा दावा मस्क यांनी केला आहे.

पुढे 2004 मध्ये इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रिक कारची कंपनी सुरु केली. टेस्ला नावाने सुरु केलेली हि कंपनी जगभर चर्चेचा विषय असते.

भाड्याच्या घरात राहतात आजही इलॉन मस्क

2020 मध्ये इलॉन मस्क यांनी त्याचे सातही आलिशान बंगले विकले. मस्क यांनी ट्विटरवर याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते कि, ‘मी माझ्या आयुष्यातील भव्यता कमी करत आहे आणि यापुढे माझ्याकडे घर असणार नाही.’ जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाच्याच्या रिपोर्टनुसार, इलॉन मस्क आता 20 बाय 20 च्या भाड्याच्या घरात राहतात. हे घर बॉक्सेबल नावाच्या हाऊसिंग स्टार्टअपने बनवले आहे. हे घर फोल्ड करता येते आणि ते एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते.

स्वतःच्या संपत्तीबद्दल पूर्ण माहिती नाही

इलॉन मस्क आज जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची चर्चा होत असते. पण इलॉन मस्क म्हणतात मला माझ्या संपत्तीबद्दल पूर्ण माहिती नाही.
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत इलॉन मस्क यांनी स्वतःच्या संपत्तीबाबत वक्तव्य केले होत. ते म्हणाले होते कि, ‘माझ्याकडे नक्की किती संपत्ती आहे हे मला माहीत नाही. माझ्या जवळ नोटांचे बंडले कुठेतरी पडून आहेत, अस होत नाही. टेस्ला, स्पेस-एक्स आणि सोलार सिटीमध्ये माझी हिस्सेदारी आहे आणि त्या मार्केट व्हाल्यूनुसार काही किंमत आहे. पण माझ्यासाठी याचा काही फरक पडत नाही कारण ते माझे ध्येय नाही.’

इलॉन मस्क यांनी चित्रपटातही अँक्टिंगही केली

उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या इलॉन मस्क यांनी चित्रपटातही अभिनय केला आहे. मस्कने जगप्रसिद्ध आयर्न मॅन 2 या चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याचबरोबर मस्कने द सिम्पसन, द बिग बँग थिअरी आणि साऊथ पार्क यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

मंगळावर मानवी वस्ती तयार करणे आयुष्याचे मोठे स्वप्न

इलॉन मस्क यांना मंगळावर मानवी वस्ती तयार करायची आहे. हे त्याचे मोठे स्वप्न आहे. मस्क यांनी एका मुलाखतीत सांगितले की, यासाठी त्यांना त्यांच्या मालकीचा सर्वात मोठा भाग गुंतवायचा आहे आणि हे मिशन यशस्वी करण्यासाठी त्यांनी सर्व मालमत्ता गुंतवली तर आश्चर्य वाटणार नाही.

इलॉन मस्कच्या म्हणण्यानुसार, मंगळावर मानवी वस्ती हे खूप मोठे यश असेल. मस्क यांच्या मते जर अणुयुद्धामुळे किंवा लघुग्रहाच्या टक्करमुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले असेल तर अशा परिस्थितीत आपल्यासाठी सर्वात योग्य ग्रह मंगळ आहे.

इलॉन मस्क हे आपल्या कामाने आणि वागण्यातून कायमच चर्चेत असतात. सध्या ट्विटरची मालकी आणि कामकाजामुळे चर्चेत आहेत. ट्विटरसाठी ते काय निर्णय घेतात आणि त्याचा काय परिणाम होईल, हे येत्या काही दिवसात कळेलच तेव्हा आपण ते समजून घेऊच.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.