Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांचे पी. ए. यापलीकडे जावून कामाचा विचार व्हायला पाहिजे

0

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काही नावांची विशेष चर्चा होती. त्यातलच एक नाव होत, ते म्हणजे अभिमन्यू पवार ! त्या निवडणुकीत अभिमन्यूजी पवार यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर जवळपास सर्वच मराठी वृत्तपत्रांनी व मराठी न्यूज चॅनेल्सनी त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा पीए असल्यामुळेच तिकीट मिळाले. अशा आशयाच्या बातम्या चालवल्या.

खरं तर पवार साहेब हे ते राजकारणात आल्यापासूनचे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले असं मला वाटत.

मागच्या २ वर्षात पवार साहेबांचे समाजकार्य, राजकीय पटलावरचा वावर मला खूप जवळून पाहता आला. सगळ्यांना माहीत असलेले आणि बऱ्याच जणांना माहीत नसलेले पवार साहेब मला पाहता आले. लातूर जिल्ह्यात विकासकामांचे वादळ घेऊन येणारे पवार साहेब ही मी पहिले आणि औशात राजकीय वादळ बनून धडकतानाही पाहिले. जवळजवळ २५ वर्ष ते संघर्ष करत आहेत पण खास करून मागच्या २ वर्षात संघर्षाचे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले पण गोंधळून जाताना, डगमगताना मी त्यांना कधीच पाहिलं नाही.

निवडणुकीच्या तयारीला लागल्यानंतर औशातील पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळावताना, तिकीट मिळाल्यानंतर प्रायोजित बंडखोरी शांत करताना अनेक पातळ्यांवर त्यांना संघर्ष करावा लागला, सर्वांनी तो संघर्ष पाहीलाही. पण याच्या पलीकडेही त्यांना अनेक कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले ज्याची अनेकांना कल्पना नाही.

“आदर्श कार्यकर्ता” हा पुरस्कार देऊन गौरव

१९९८ – ९९ मध्ये अभिमन्यू पवार यांनी वॉर्ड अध्यक्ष म्हणून भाजपमध्ये सुरुवात केली, पुढे युवा मोर्चा व शहर जिल्हा कार्यकारिणीत अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीपणे निभावली. २०१० साली त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रभोधिनीतर्फे भाजपचे तत्कालीन अध्यक्ष श्री नितीन गडकरीजी यांच्या हस्ते भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत “आदर्श कार्यकर्ता” हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

२० वर्ष केलाय भाजप मध्ये काम

आजही लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष टिकवण्यात-वाढवण्यात कोणीकोणी महत्वाची भूमिका निभावली हा प्रश्न विचाराल तर जी काही मोजकी नावे समोर येतील त्यात अभिमन्यू पवार हे नाव हमखास असेल. पवार साहेबांना औशातून मिळालेली उमेदवारी ही अनेकांना वाटेल देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असल्यामुळे दिली असे वाटते.

पण खूप कमी लोकांना हे माहिती आहे कि २० वर्ष अभिमन्यू पवार यांनी पक्षात काम केला आहे त्याचिचक हि पोचपावती म्हणावी लागेल. त्यांनी अशा सगळ्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून काम करण्यावर, पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडण्यावर भर दिला आणि म्हणूनच कदाचित संपूर्ण महाराष्ट्राला दाखल घ्यायला लावणारा विजय संपादित केला.

विकासाचे व्हिजन

उन्हाळ्यात औसा शहरात महिनोंमहिने पाणी येत नाही. औसा शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. किल्लारी, मातोळा, खरोसा अशा पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित केल्या. सरकारी योजना/प्रकल्प मंजूर होण्यापासून पूर्ण होण्यापर्यंत अनेक टप्पे असतात. यातील कुठल्याही टप्यावर पाठपुराव्यात ढिलाई झाली की ती योजना/तो प्रकल्प रखडला म्हणून समजा.

आपल्या देशात एखाद्या मंजुरीसाठी, मंजुरी मिळाली तरी निधीसाठी, निधी मिळाला तर बिल वेळेवर पास झाले नाही म्हणून प्रकल्प/योजना अडकून पडल्याचे कमी उदाहरणं नाहीत. पण पवार साहेबांनी मंजूर करवून आणलेली कामे याला अपवाद आहेत. एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावं हे शिकण्यासाठी उत्तम विद्यापीठ म्हणजे पवार साहेब. लॉकडाऊन मुळे निधीची कमतरता भासून राज्यातले अनेक प्रकल्प रखडले आहेत पण इतक्या कसोटीच्या काळातही औसा शहर पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने सुरु आहे.

एसएमएस वर काम करणारा नेता.

एखाद्या अधिकाऱ्याला फोन करून एखाद्याचे काम मार्गी लावणारे अनेक लोकप्रतिनिधी आहेत पण एसएमएस करून सर्वसामान्यांचे काम मार्गी लावणारे एकमेव नेतृत्व म्हणजे पवार साहेब. पवारसाहेब एखाद्या ठिकाणचे एखाद्याचे अडलेले काम फक्त मेसेजवर सहज मार्गी लावतात. माझ्या जवळच्या मित्राच्या कुटुंबातील एक सदस्य पुण्यातील एका खाजगी दवाखान्यात अत्यंत सिरिअस कंडिशनमध्ये ऍडमिट झाला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती आणि लॉकडाऊनमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी वा इतर कुठूनही मदत मिळत नव्हती.

माझ्या मित्राचे कुटुंब पश्चिम महाराष्ट्रातील एका गावातील, दवाखाना पुण्यात तरीही औशाचे आमदार मदत करू शकतील आणि करतील असा विश्वास असल्याने मी पवारसाहेबांना काहीतरी सरकारी मदत मिळवून देण्याची विनंती मेसेज करून केली. त्यांनी पुण्याचे धर्मादाय आयुक्त यांना मेसेज करून हा विषय त्यांच्या कानावर घातला. मला धर्मादाय आयुक्त यांचा नंबर पाठवून त्यांच्याशी बोलायला सांगितलं. पवारसाहेबांच्या एका मेसेजने रुग्णाचे जवळपास २ ते २.५ लाखाचे बिल योजनेतून भरले गेले. अशे एक ना अनेक उदाहरणे मला माहीत आहेत जिथं पवार साहेबांच्या फक्त मेसेजने काम मार्गी लागले.

राजकीय टीकाटिपण्णीकडे दुर्लक्ष करून काम करत राहणारे आजचे लातूरचे हे नेतृत्व महाराष्ट्रातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी खूप मोठे काम करेल असा विश्वास माझ्यासारख्या हजारो जणांना आहे. पवारसाहेब, तुमच्या वाट्याला अडचणी येऊ नयेत अशी तर मी प्रार्थना करणार नाही कारण तुम्हाला अडचणीला संधीत रूपांतरित करता येतं. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे, विकासापासून वंचित राहिलेल्या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे बाळ तुम्हाला मिळो हीच देवाकडे प्रार्थना. पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पूर्णविराम.

  • बापू सुगावे, पुणे

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.