ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती 7300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
ऋषी सुनक इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत त्यांनी लग्न केलं आहे.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे.औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात आणि 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डोंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत म्हटलं की,
‘पक्षाने केलेला जनादेश पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने आपण राजीनामा देत आहे. लिझ ट्रस सर्वात कमी कार्यकाळ असणाऱ्या पंतप्रधान ठरल्या आहेत. महागाई कमी करण्यात आपण अयशस्वी ठरलो आहे.’
वाढती महागाई आणि फसलेली कर रचना यामुळे लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. यामुळे ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप आला आहे. ब्रिटनला लवकरच नवे पंतप्रधान मिळणार आहेत. लिझ यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान कोण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक नावे आहेत. यामध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचं नाव पुढे होत पण आता ऋषी सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल आहे.
कोण आहेत ऋषी सुनक?
ऋषी सुनक यांच्या रूपानं पहिल्यांदाच एक भारतीय आणि दक्षिण आशियाई वंशाचा खासदार युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे. ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंजच्या साऊदम्पटनमध्ये झाला होता. सुनक यांचे वडील यशवीर केनियातून तर आई उषा टांझानियातून ब्रिटनला येऊन स्थायिक झाली होती.
पण ते मूळचे ब्रिटिशकालीन भारतातल्या पंजाब प्रांतातले आहेत. यशवीर डॉक्टर होते आणि उषा फार्मसी चालवायच्या. पण ऋषी सुनक फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्राकडे वळले.
ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा भारतातून आफ्रिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर त्यांचे वडील आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबमधून टांझानियाला गेले. यानंतर त्यांच्या आईचे कुटुंब टांझानियाहून ब्रिटनमध्ये गेले.
ऋषी सुनक यांचं शिक्षण
ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. पण त्याचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते. त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी), राजकारण (पॉलिटिक्स) आणि अर्थशास्त्रात (इकॉनॉमिक्स) उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं. सुनक यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे.
नारायण मूर्ती यांचे जावई
ऋषी सुनक इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत त्यांनी लग्न केलं आहे. ऋषी सुनक 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. ऋषी सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या चांगलं काम केलं आहे. कोरोनाच्या काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं आहे. ब्रिटनचे ते सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत आणि त्यांची संपत्ती 7300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम