Take a fresh look at your lifestyle.

ऋषी सुनक – अक्षता यांची एकत्रित संपत्ती राजा चार्ल्स यांच्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा जास्त आहे.

ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी त्यांच्या रूपानं पहिल्यांदाच एक भारतीय वंशाचा व्यक्ती युकेच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

0

मागच्या काही दिवसातील जगभरातील माध्यमांचा चर्चेचा विषय म्हणजे ऋषी सुनक. अखेर ऋषी सुनक यूकेचे नवीन पंतप्रधान झाले आहेत. याच वर्षी 6 जुलैला ऋषी सुनक यांनी बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून अर्थमंत्री या पदावरून राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर अनेक इतर मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि शेवटी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आपल्या राजीनाम्याची घोषणा करावी लागली.

ऋषी सुनक यांच्या बद्दल भारतीय माध्यम आणि सोशल मीडियावर बरंच काही लिहलं जात आहे. याला काही खास कारणे आहेत.

ऋषी सुनक भारतीय वंशाचे

ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी त्यांच्या रूपानं पहिल्यांदाच एक भारतीय वंशाचा व्यक्ती युकेच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

सुनक यांचे वडील यशवीर केनियातून तर आई उषा टांझानियातून ब्रिटनला येऊन स्थायिक झाली होती. पण ते मूळचे ब्रिटिशकालीन भारतातल्या पंजाब प्रांतातले आहेत. यशवीर डॉक्टर होते आणि उषा फार्मसी चालवायच्या.

इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचे जावई

ऋषी सुनक हे ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि सूधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ऋषी यांनी 2009 साली अक्षरा मूर्ती यांच्याशी लग्न केलं होतं. सिलिकॉन व्हॅलीतील स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये ते पहिल्यांदा नारायण मूर्ती आणि सूधा मूर्ती यांची कन्या अक्षता यांना भेटले. बंगळुरु येथे ऋषी आणि अक्षता यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली आहेत.

ऋषी सुनक हिंदू असल्याचे अभिमानाने सांगतात

आपलं हिंदू असणं ऋषी सुनक यांनी कधी लपवून ठेवलं नाही. ते अनेकदा मंदिरात जातात आणि धार्मिक समारंभांमध्ये सहभागी होतात. 2020 साली जेव्हा त्यांनी अर्थमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तेव्हा त्यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती.

असे बरेच व्हीडिओ आहेत ज्यात तुम्ही त्यांना गायीची पूजा करताना पाहू शकता. 2020 साली दिवाळीत घराबाहेर दिवे उजळवणाऱ्या ऋषी सुनक यांचा एक व्हीडिओ इंटरनेटवर आहे. ऋषी सुनक स्वतःला ‘प्राऊड हिंदू’ म्हणतात अशा स्वरूपाच्या बातम्या अजूनही मीडियात येत आहेत.

हिंदुंच्याच महत्त्वाच्या सणाच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने त्यांच्या पंतप्रधान बनण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

ऋषी सुनक आणि अक्षता यांची एकत्रित संपत्ती राजा चार्ल्स यांच्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा जास्त

ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता (इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या) यांची एकत्रित संपत्ती राजा चार्ल्स यांच्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती हे दाम्पत्य ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. ‘सण्डे टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ऋषी आणि अक्षता २२२व्या स्थानावर आहेत. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार, अक्षता या इन्फोसिसमध्ये ०.९३ टक्के भागधारक आहेत. यातून त्यांना १.२ मिलियनचे उत्पन्न मिळते. २०२२च्या सुरुवातीला ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता यांची संपत्ती इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांच्यापेक्षाही जास्त असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

अक्षता यांच्या वैयक्तिक संपत्तीत वाढ होऊन सुमारे ३५० मिलियन पाऊंड्स (तीन हजार कोटी) मालमत्तेच्या त्या मालक झाल्या होत्या. तर ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीची एकूण मालमत्ता इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्स यांच्या मालमत्तेपेक्षा दुप्पट आहे. प्रिन्स चार्ल्स यांची एकूण संपत्ती सुमारे ३०० ते ३५० मिलियन पाऊंड इतकी आहे. भारतीय रुपयानुसार या दाम्पत्याकडे सहा हजार ८४५ कोटींहून अधिक मालमत्ता आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.