बाळासाहेब ठाकरे तेजसविषयी बोलताना म्हणायचे ‘तो माझ्यासारखा तडक-फडक आहे’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच सक्रीय राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे एक चिरंजीव आदित्य ठाकरे राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले. मंत्री देखील झाले. पण उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे सक्रीय राजकारणापासून नेहमीच अलिप्त राहिले आहेत.
पण मागच्या काही दिवसात तेजस ठाकरे देखील सक्रीय राजकारणात उतरणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच शिवसेना नेते आणि राज्य सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे युवासेनेचे प्रमुखपद सोडणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे.
तेजस ठाकरे जर सक्रीय राजकारणात आले तर त्यांच्याकडे कोणती मोठी जबाबदारी देण्यात येणार का? त्यातही जर आदित्य ठाकरे यांनी जर युवासेना प्रमुख पद सोडले तर ते तेजस ठाकरे यांच्याकडे दिली जाईल. अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते आहे.
2006 साली आदित्य ठाकरे यांना जेव्हा शिवसेनेने सक्रीय राजकारणात लाँच केलं. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेजसविषयी बोलताना तो माझ्यासारखा तडक-फडक असल्याचं म्हटलं होतं, हेही विसरता येणार नाही.
काही दिवसापूर्वी तेजस ठाकरे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या स्फोटक शुभेच्छांची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) August 7, 2021
तेजस ठाकरे काय करतात?
वडील उद्धव ठाकरे आणि मोठे बंधू-मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे अद्याप सक्रीय राजकारणात उतरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेजस यांचे दर्शन घडले होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तेजस यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.
वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी वन्य जीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्या आहेत. यातील एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे नाव दिलं आहे
ठाकरे कुटुंबीयांचे नाव
तेजस ठाकरे यांना जंगल क्षेत्रात फिरून नवनवीन शोध लावण्याची आवड आहे. तेजस महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या जंगलांत फिरून संशोधन करत असतात. कधी खेकड्यांच्या, तर कधी पालीच्या प्रजातींचा शोध लावत असतात.
जंगलात अभ्यास करताना खेकड्यांच्या आणि पालीच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत. एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांचे नाव दिले आहे.
पालींच्या विविध प्रजातींचा शोध लावला आहे
गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडिटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातींची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील शेवटचे नाव हे ठाकरे या आडनावावरून देण्यात आले आहे.
खेकड्यांच्या संशोधनानंतर तेजस ठाकरेंनी पालींच्या विविध प्रजातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे.
बोईगा ठाकरे
काही दिवसांपूर्वी तेजस ठाकरेंनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ असं ठेवण्यात आलं आहे.
सापाच्या या प्रजातीचं नाव तेजस ठाकरे यांच्या नावावरुन देण्यात आलं. या सापाच्या प्रजातीचा शोध तेजस ठाकरे यांनी लावला होता, त्यामुळे या सापाच्या प्रजातीला त्यांचं नाव देण्यात आलं.
ठाकरे कुटुंबातल्या चौथ्या पिढीतले तेजस ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली होती .सह्याद्री पर्वतरांगांमधल्या अंबोली घाटातल्या हिरण्यकश नदीत त्यांनी हा मासा शोधला. या माशाला सोनेरी केस आहेत आणि म्हणूनच त्याला ‘हिरण्यकेशी’ असं नाव देण्यात आलं आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम