Take a fresh look at your lifestyle.

३००० वर्षांपासून खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा रंजक इतिहास

२०२० मध्ये पूर्व नियोजित ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली होती आणि ती या वर्षी जपानच्या टोकीयो शहरात खेळवण्यात आली.

0

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अख्खं जग संकटात सापडले होते, तेव्हा अनेक शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक व्यवसाय व इतर क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. महामारीचा फटका हा क्रीडा क्षेत्रालाही बसला.

अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धा एकतर रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ठकल्याव्या लागल्या होत्या. त्याचप्रमाणे २०२० मध्ये पूर्व नियोजित ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली होती आणि ती या वर्षी जपानच्या टोकीयो शहरात खेळवण्यात आली.

ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास

ऑलिम्पिक खेळांची सुरुवात नेमकी कधी झाली, हे जरी सांगता येत नसले तरी, उपलब्ध माहितीनुसार या खेळांची आयोजन जवळपास ३००० वर्षांपासून होत आहे. असे निदर्शनास येते. सर्वात आधी ऑलिम्पिक खेळ ग्रीस देशातील ओलीम्पिया या शहरात खेळल्या गेले.

आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात १८९६ साली अथेन्स (ग्रीस) येथे झाल्याचे समजते. ज्यामध्ये एकूण १४ देशांनी आपला सहभाग नोंदविला होता.

ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रतिक

सर्व परिचित पारंपरीक ऑलिम्पिकचा लोगोची म्हणजे परस्पर जोडलेले पाच वेगवेगळ्या रंगाच्या रिंग्ज याची निर्मिती आयओसीचे संस्थापक बॅरन पियरे डी कौबर्टिन यांनी १९१३ मध्ये केली. ऑलिम्पिकच्या लोगोची पांढरी पार्श्वभूमी आहे.

ज्यामध्ये पहिल्यांदा निळ्या, काळा आणि लाल रंगांच्या रिंग असतात आणि दुसऱ्या रांगेत पिवळा आणि हिरवा. हे रंग सहभागी प्रत्येक देशाच्या ध्वजामधून घेतेलेले आहेत. हे रंग ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेणार्‍या प्रत्येक देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले होते जे आंतरराष्ट्रीय प्रतीक बनले.

खेळाची निशाणी म्हणजे एकात एक गुंतलेले ५ रंगांचे ५ वर्तुळ. हे ५ वर्तुळ ५ खंडांना दर्शवितात.

  • निळा वर्तुळ : युरोप खंड
  • पिवळा वर्तुळ : आशिया खंड
  • काळा वर्तुळ : आफ्रिका खंड
  • हिरवा वर्तुळ : ओशिनिया खंड
  • लाल वर्तुळ : अमेरिका खंड

सध्या चालू असलेल्या टोकीयो ऑलिम्पिकचा लोगो जपानच्या आसाओ टोकलो यांनी तयार केला आहे. त्यात आयताकृती आकारांच्या तीन प्रकारांनी बनवलेले डिझाइन आहेत, ते विविध देश, संस्कृती आणि विचार करण्याच्या पद्धतींचे प्रतिनिधित्व करते. त्यात “विविधतेत एकता” असा संदेश देण्यात आला आहे.

इंडिगो निळ्याच्या पारंपारिक जपानी रंगातील हे आयताकृती डिझाइन जपानचा सुरेखपणा आणि सुसंस्कृतपणा यांचे दर्शन घडवते. ऑलिम्पिक आणि पॅरालॉम्पिक खेळ जगाला जोडण्यासाठी व्यासपीठ म्हणून विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतात ही वस्तुस्थिती देखील यात व्यक्त होते.

ऑलिंपिक हा क्रीडा स्पर्धेचे सर्वोच्च व्यासपीठ आहे जिथे जगभरातील खेळाडू सहभागी होतात. खंडातील एकतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या रिंग्ज एकमेकांशी संवाद साधून तयार केल्या गेल्या. ऑलिंपिकचा हा लोगो जगभरात आपल्या साधेपणाने आणि आकर्षकतेने जगभर प्रभावित करत आहे.

ऑलिम्पिक पदकांची मानके

ऑलिम्पिक खेळांमध्ये मिळणारे पदक तीन प्रकारचे असतात. प्रथम विजेत्याला सुवर्ण, द्वितीय विजेत्याला रजत आणि तृतीय विजेत्याला कांस्य पदक दिले जाते. हे पदक वर्तुळाकार असून त्यांचा व्यास ६० मिमी (कमीतकमी) आणि जाडी ३ मिमी (कमीतकमी) असते. या पदकांवर आयोजक देशाचे नाव, वर्ष कोरण्यासाठी मोकळी जागा सोडलेली असते.

सुवर्ण पदक हे वास्तविक पाहता चांदीचे असते ज्यावर सुवर्ण मुलामा दिलेला असतो. रजत पदक हे चांदीचे असते तर कांस्य पदक हे तांबे आणि जस्त या धातूंच्या मिश्रणापासून बनवले जाते. या पदकांचे वजन ठरलेले नसते. (ऑलिम्पिक पदकांची परिनामे निश्चित नसून ती प्रत्येक आयोजक देशानुसार बदलू शकतात.)

पॅरालॉम्पिक स्पर्धा

दिव्यांग खेळाडूंसाठी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पॅरालॉम्पिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे ज्या देशात ऑलिम्पिक स्पर्धा होतात त्याच देशात पॅरालीम्पिक स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.