पिक्चर मध्ये खलनायकाची भूमिका करणारा सोनु सुद खरा हीरो आहे
सध्या आपल्या देशात सोनू सूद हा पिक्चरमधील भूमिकेपेक्षा त्याच्या सामाजिक कामामुळे जास्त चर्चेत आहे. आतापर्यंत जवळपास ५० सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याने टॉलीवूड,बॉलीवूड मध्ये देखील काम केले आहे.
आपल्या करिअरची सुरुवात कल्लाजागर या चित्रपटातून केली. तेव्हापासून तर आजपर्यंत सोनू सूद याने अनेक सिनेमांमध्ये काम केले. कोरोनाच्या काळात त्याने मजुरांना केलेली मदतीमुळे सोनू सूद सध्या चर्चेत आहे.
इंजिनीअरिंग ते मिस्टर इंडिया
सोनू सूद यांचा जन्म मे १९७३ मध्ये पंजाबमधील मोगा येथे झाला. त्याचे वडील व्यावसायिक आहेत आणि त्याची आई इंग्रजी आणि इतिहासाची प्राध्यापक आहे. त्याला दोन बहिणी आहेत. सूदने पंजाबमध्ये शालेय शिक्षण घेतले आणि नंतर ते नागपुरात स्थायिक झाले त्यानंतर त्याने नागपूर च्या यशवंतराव चव्हाण कॉलेज मधून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री यशस्वीरित्या पूर्ण केली.
नागपुरात इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना सूदने ग्रासिम मिस्टर इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि टॉप फाइव्हमध्ये प्रवेश केला. तसेच तो अभियांत्रिकीचा पदवीधर आहे. त्याचं सोनालीशी लग्न झालं असून त्यांना एक मुलगा ईशांत आहे. तो मिस्टर इंडियाचा स्पर्धक होता.
खासगी कंपनीतही काम
आणि पदवी नंतर स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोनू मुंबईला आला. आणि सोनू मुंबईला आला तेव्हा त्याच्याकडे फक्त 5500 रुपये होते. आणि म्हणूनच त्याने आपली खोली सहा लोकांबरोबर शेअर केली. पैसे संपल्यानंतर सोनू दक्षिण मुंबईतील एका खासगी कंपनीतही काम करत होता. सोनू सूदलाही रेल्वे ची पास काडून खोली ते कंपनी पर्यंत लोकल ने प्रवास करून जायचा . मात्र, नोकरीबरोबरच सोनू सूद अभिनेता बनण्याच्या आयुष्यात गुंतला होता.
पहिला चित्रपट
१९९९ साली कल्लाजागर नावाच्या चित्रपटात पादरी ची भूमिका करण्याची संधी त्याला मिळाली. तो त्याचा पहिला चित्रपट होता . आणि मग त्यानंतर अनेक वर्षे सोनू दाक्षिणात्य चित्रपटांच्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या भूमिका करताना दिसला .तथापि, 2002 मध्ये सोनूने शहीद-ए-आझम चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये पाऊल टाकले . आणि त्याने त्या चित्रपटात भगतसिंगांची भूमिका साकारताना दिसला. तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त सोनू सूदने पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
नकारात्मक भूमिकेसाठी पुरस्कार
2009 मध्ये अरुंधती नावाच्या एका तेलुगू चित्रपटात त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा नंदी पुरस्कारही मिळाला.आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार, नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अप्सरा पुरस्कार, नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी आयफा पुरस्कार, नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिमा पुरस्कार.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम