निधनानंतर ज्यांचे चित्रपट रिलीज झाले असे बॉलिवूड स्टार्स
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा “दिल बेचारा” हा चित्रपट काल २४ जुलै रोजी हॉटस्टार वर रिलीज झाला. दिल बेचारा च्या गाणी आणि ट्रेलर ला ऑनलाईन माध्यमातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
सुशांत सिंग ने १४ जून रोजी मुंबईमध्ये आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यू नंतर त्याचा “दिल बेचारा” रिलीज झाल्यानंतर त्याचे चाहते भावूक झाले. सोशल माध्यमातून तशा अनेक पोस्ट तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील.
बॉलीवूड मध्ये यापूर्वीही अनेक वेळा अभिनेत्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चित्रपट रिलीज होण्याचे प्रसंग घडले आहेत. त्याविषयी थोडी माहिती
श्रीदेवी
९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून ज्ञात असलेल्या श्रीदेवीचे २०१८ साली अचानक निधन झाले. दुबई येथे एका लग्नात सहभागी होण्यासाठी ती दुबईला गेली होती. त्यावेळी तिथेच तिचे निधन झाले.
त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात श्रीदेवी दिसली होती. या चित्रपटात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ असे दिग्गज कलाकार होते. यामध्ये श्रीदेवीने कॅमिओची भूमिका साकारली होती.
ओम पुरी
आपल्या अभिनयासाठी सुप्रसिद्ध असलेल्या ओम पुरी यांनी अनेक चित्रपटात काम केले. ६ जानेवारी २०१७ रोजी ओम पुरी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यू पूर्वी एक महिना आधीच त्यांनी अभिनेता सलमान खान सोबत ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले होते.
ओम पुरी यांच्या मृत्यू नंतर सहा महिन्यानंतर २५ जूनला ट्यूबलाइट चित्रपट रिलीज झाला होता.
स्मिता पाटील
आपल्या सहज अभिनयासाठी स्मिता पाटील बॉलीवूड मध्ये प्रसिध्द होती. १३ सप्टेंबर १९८६ च्या दिवशी स्मिता पाटील यांचे निधन झाले. पण स्मिता यांचा शेवटचा चित्रपट ‘बादशाह’ स्मिताच्या मृत्यूनंतर १९८९ मध्ये रिलीज झाला होता.
दिव्या भारती
आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी दिव्या भारती बॉलीवूड मध्ये अभिनेत्री म्हणून काम करू लागली, पण १९ च्या वर्षी झालेल्या तिच्या मृत्यूनंतर मोठा धक्का बसला होता. साउथच्या चित्रपटातून काम केल्यानंतर दिव्या ने बॉलीवूड च्या काही चित्रपटात काम केले होते.
मुंबईतील राहत्या घरातून पडल्याचे तिचे निधन झाले होते. तिच्या निधनानंतर ९ महिन्यानंतर “शतरंज” हा चित्रपट रिलीज झाला होता. तो चित्रपट सुपरहिट ठरला होता.
संजीव कुमार
संजीव कुमार यांना शोले मधील ठाकूरच्या भूमिकेसाठी मोठी प्रसिद्धी मिळाली होती. संजीव कुमार यांच्या मृत्यू नंतर ८ महिन्यांनी त्यांची “प्रोफेसर कि पडोसन” चित्रपट रिलीज झाला होता.
संजीव कुमार यांना लहानपणापासून हृद्यचा त्रास होता. त्यामुळे ६ नोव्हेंबर १९८५ रोजी संजीव कुमार यांचे निधन झाले होते.
मधुबाला
मुगल ए आझम या चित्रपटातील अभिनयामुळे आजपर्यंत मधुबालाच्या अभिनयाची चर्चा होत असते. मधुबालाने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. आजारामुळे दीर्घकाळ आजारी राहिल्यानंतर वयाच्या ३६ च्या वर्षी मधुबालाचे निधन झाले.
१९६९ साली मधुबालाचे निधन झाले. तिच्या निधनानंतर दोन वर्षानंतर १९७१ साली मधुबालाचा शेवटचा चित्रपट ‘ज्वाला’ रिलीज झाला होता.
राजेश खन्ना
बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार म्हणून आपण राजेश खन्ना यांना ओळखतो. २०१२ साली हार्ट अॅटक मुळे राजेश खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षानंतर २०१४ साली राजेश खन्ना यांचा शेवटचा चित्रपट ‘रियासत’ रिलीज झाला होता.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम