महात्मा गांधी यांनाही एकदा क्वारंटाइन केले होते
जगात जसा कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला आहे. तसं जवळपास संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसतात किंवा कोरोना होता अश्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येते.
खरतरं क्वारंटाइन हा शब्द अनेकांना कोरोंना आल्यानंतर समजला असेल. पण शब्द तुम्ही आज ऐकला असेल पण हि संकल्पना मात्र नवीन नाही, तर बरीच वर्षे जुनी आहे.
खरतरं तुम्ही ऐकल असेल जेव्हा महाराष्ट्रात प्लेग आला होता. तेव्हा गावच्या गावे क्वारंटाइन करण्यात आली होती. पण त्याही पूर्वीपासून क्वारंटाइन करण्याची पद्धत आहेत. असाच क्वारंटाइनचा प्रसंग महात्मा गांधीं यांच्यावरही आला होता.
गांधी त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत राहत होते
गोष्ट १८९६ची आहे. महात्मा गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत वकिली करत होते. त्याच काळात त्याला वाटले की तो पत्नी कस्तुरबा आणि मुलांना आपल्याबरोबर दक्षिण आफ्रिकेत घेऊन जावे. यासाठी ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
भारतातून गांधी यांचा परतीचा प्रवास डिसेंबर 1896 मध्ये सुरू झाला. गांधी यांच्या सोबत जहाजावर त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांची मुले हरीलाल आणि मनिलाल होते. त्याबरोबर गांधीं यांच्या विधवा बहिणीचा मुलगा गोकुळदास सुद्धा त्यांच्यासमवेत होता.
जानेवारी 1897 मध्ये त्यांचे जहाज डर्बनच्या किनाऱ्यावर पोहचले. पण त्यावेळी लोकांना जहाजातून उतरण्याची परवानगी नव्हती.
खरं तर, गांधी आफ्रिकेला रवाना झाले तेव्हा राजकोटसह जगाच्या बर्याच भागांत प्लेग पसरला होता. त्या काळात वैद्यकीय व्यवस्था प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे साथीचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायचा. अशा परिस्थितीत, साथीच्या भागातून येणारी जहाजे बंदरात लंगर घालण्यापूर्वी पिवळा ध्वज दाखवायची.
हा ध्वज दाखविल्यानंतर जहाजातील लोकांची वैद्यकीय तपासणी केली जायची आणि त्यानंतरच सर्व काही ठीक झाल्यावरच, तो पिवळा ध्वजखाली केला जाईल. तेव्हाच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा असा विश्वास होता की प्लेग चे विषाणू २३ दिवस जगू शकतात. म्हणूनच जहाज भारतापासून निघाल्यापासूनचे २४ दिवस पूर्ण होईपर्यंत जहाज वेगळे ठेवण्यात यायचे.
गांधी ज्या जहाजात होते त्या जहाजातही तेच घडले. 13 जानेवारी 1897 रोजी लोकांना जहाजातून बाहेर काढण्यात आले.
त्या काळातील एका संदर्भपुस्तकात लिहले आहे कि, गांधी जहाजात उतरले तेव्हा ‘युरोपियन’ लोकांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांच्याकडे अंडी आणि दगड फेकली. त्याला जमावाने मारहाण केल्याचाही उल्लेख त्यात आहेत.
हे प्रकरण वाढले, त्यानंतर लंडनहून सूचना आल्या. त्यात लोकल सरकारला गांधी यांच्यावर हल्ला करणार्यांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले. कारवाईही करण्यात आली. काही लोक पकडले गेले.
पण गांधींनी आरोपींना ओळखण्यास नकार दिला. म्हणाले,
त्यांची दिशाभूल झाली आहे. जेव्हा त्यांना सत्य कळते तेव्हा त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना वाईट वाटेल. मी त्यांना क्षमा करतो.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम