जगातला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना कसा झाला माहिती आहे का ?
तसं पाहिलं तर क्रिकेट हा भारतीय लोकांचा जीव कि प्राण आहे. पण जागतिक दृष्ट्या विचार केला तर फार कमी देशात क्रिकेट खेळला जातो. पण क्रिकेटच्या स्पर्धा मधून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे वेगवेगळ्या देशांसोबत सतत क्रिकेटचे सामने खेळवले जातात. पण विचार केला आहे का ? पहिला क्रिकेट सामना कधी खेळला गेला असावा.
सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसे ओळख नसलेल्या अमेरिका विरूद्ध कॅनडा या दोन देशात पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात आला.
१८४४ साली २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान जगातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना मॅनहॅटन शहरात खेळवण्यात आला होता. अमेरिका विरूद्ध कॅनडा अशी मॅच झाली होती. तीन दिवसांच्या या मॅच मध्ये कॅनडाच्या टीमने २३ धावांनी विजय मिळवला होता.
या पहिल्या मॅचमध्ये अमेरिकेचे हॅरी रसल आणि रॉबर्ट वॉलर तर कॅनडाचे जॉन कोनोली यांनी पंच म्हणून काम पाहिले होते.
या मॅचमध्ये अमेरिकेने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या इनिंगमध्ये कॅनडाने बॅटिंग केली. सलामीवीर डेव्हिड विंकवर्थ, मधल्या फळीतील जॉर्ज शार्प आणि तळाचा फलंदाज फ्रिलींग यांनी प्रत्येकी सर्वाधिक १२ धावा केल्या होत्या. त्या बळावर कॅनडाने ऑलआउट होत ८२ रन केल्या होत्या.
कॅनडाच्या पहिल्या इंनिंगनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये अमेरिकेला सर्वबाद ६४ धावा करता आल्या होत्या. त्यात मधल्या फळीतील रॉबर्ट टिनसन याने सर्वाधिक १४ धावा केल्या होत्या. त्यानंतर कॅनडाचा दुसरा डाव ६४ धावांत आटोपला होता. त्यात डेव्हिड विंकवर्थने सर्वाधिक १४ धावा केल्या होत्या. शेवटच्या डावात मिळालेले ८२ धावांचे आव्हान अमेरिकेला पेलवले नाही. शार्पच्या ६ बळींच्या जोरावर कॅनडाने अमेरिकेला ५८ धावांवरच रोखले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम