किरण बेदी यांनी खरंच इंदिरा गांधी यांची गाडी क्रेनने उचलून नेली होती का ?
लहानपणापासून आपल्याला जनरल नॉलेज मध्ये एक प्रश्न कायम विचारला जातो. पहिली महिला आय. पी. एस. आणि त्यावर आपण आजवर उत्तर देत आलो. किरण बेदी. पण पहिली महिला आय. पी. एस. यापलीकडे देखील किरण बेदी यांचे बरेच मोठे काम आहे. आपण आज त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गाडी
तुम्ही आजवर अनेक वेळा हा किस्सा ऐकला असेल
१९८३ साली किरण बेदी दिल्ली मध्ये ट्राफिक कमिशनर होत्या. तेव्हा एका दिवशी सब इन्स्पेक्टर निर्मल सिंग यांनी बेदी यांना फोन करून सांगितलं कि एक एम्बेसेडर कार चुकीच्या ठिकाणी पार्क केलेली आहे. त्यावेळी बेदी यांनी ती गाडी पोलीस चौकीला आणायला सांगितली. त्यानंतर पोलीस ती गाडी क्रेनने उचलून आणत असताना गाडीचा ड्रायव्हर धावत आला आणि म्हणाला “हि गाडी इंदिरा गांधी यांची आहे.”
त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान अर्थात देशातील सर्वाधिक शक्तिशाली नेत्या होत्या. पण ते समजल्यावरही किरण बेदी म्हणाल्या गाडी कोणाचीही असेल पण दंड भरावा लागेल आणि गाडी क्रेनने उचलून चौकीला पाठवून दिली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी किरण बेदी यांचे कौतुक केले.
पण हे सत्य आहे का ?
पण त्यावेळी नक्की काय घडल होत, हे स्वतः किरण बेदी यांनीच २०१५ साली दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी NDTVला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण बेदी यांनी खरा प्रसंग सांगितला होता.
या मुलाखतीमध्ये बेदी यांनी सांगितले आहे कि ती गाडी निर्मल सिंग यांनीच उचलली होती. पण त्यानंतर कमिशनर असलेल्या किरण बेदी यांना विचारलं होत, तुम्ही निर्मल सिंग यांच्यावर कारवाई करणार का ? त्यावर बेदी यांनी उत्तर दिले होते कि
“कारवाई करण्याचे काहीच कारण नाही. त्याउलट मी त्यांचा सत्कार करेन कारण त्यांनी हिम्मत दाखवली आहे.“
खरंतर किरण बेदी त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेळा वादग्रस्त चर्चेत आल्या. त्यांच्यावर अनेक आरोप लावले गेले. जितकं यश त्यांनी मिळवलं तिचकीच टीका सुद्धा त्यांना मिळाली.
पण याच किरण बेदींनी पोलिस खात्यात येऊन महिलांसाठी एका नवा मार्ग निर्माण केला. ज्या काळात त्या या क्षेत्रात आल्या आणि स्वत:ला सक्षमपणे, कणखरपणे सिद्ध करू लागल्या तो काळ पाहता त्यांनी जे काही कार्य केले, जे काही यश मिळवले ते भारताच्या इतिहासातले एक महत्वाचे पर्व म्हणून जगात कायम गौरविले जाईल.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम