आपल्या पहिल्या चित्रपटासाठी ऋषी कपूर यांनी मानधन म्हणून घेतले होते एक चॉकलेट
भारतीय चित्रपट सृष्टीत महत्वाचं योगदानं देणाऱ्या कपूर घराण्यातील एक व्यक्ती आणि बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
ऋषी कपूर आजवर बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आजवर शेकडो सिनेमे केले. पण त्याच्या पहिल्या चित्रपटाचा किस्सा तुम्हाला ऐकायलाच हवा. कारण ऋषी कपूर यांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी मानधन म्हणून फक्त एक चॉकलेट घेतले होते.
खुद्द ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता.
ऋषी कपूर यांचे वडील वडिल राज कपूर एक प्रसिद्ध अभिनेता होते. तेच नव्हे तर ऋषी कपूर यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर हे देखील सिनेअभिनेते होते. त्यामुळे ऋषी कपूर यांची लहान असतानाच त्यांच्या चित्रपट करिअरची सुरुवात झाली. १९५५ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्री ४२०’ या चित्रपटामधून ऋषी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. “श्री ४२०” या चित्रपटात काम करण्यासाठी ऋषी कपूर यांनी एक अट ठेवली होती. जर त्यांना चॉकलेट मिळाले तरच ते त्या सिनेमात अभिनय करतील. त्यावेळी त्यांची ही इच्छा अभिनेत्री नर्गिस यांनी पूर्ण केली आणि त्यांना एक चॉकलेट दिले.
किस्सा १९५४ सालचा आहे,‘श्री ४२०’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर हा चित्रपट दिग्दर्शित करत होते. या चित्रपटात एका लहान मुलाचा सीन होता. तो सीन करण्यासाठी राज कपूर छोट्या ऋषी कपूर यांना विनंती करत होते. परंतु ऋषी यांनी वडिलासमोर एक अट ठेवली. जर मला आत्ताच्या आत्ता या क्षणी चॉकलेट मिळाले तरच मी त्या दृश्यात काम करेन. त्यावेळी अभिनेत्री नर्गिस यांनी ऋषी कपूर यांचा हा हट्ट पूर्ण केला आणि एका चॉकलेटाच्या मानधनावर ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम