महाराष्ट्र ‘कोरोना’शी लढताना या माणसाला विसरू नका !
कोरना व्हायरस चीन मधून जगभरात पसरला. मागच्या काही दिवसात तो महाराष्ट्रात देखील आला. राज्यात कोरोना व्हायरस आल्याने राज्यभर हंगामा झाला. राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सरकारने युद्ध पातळीवर काम सुरु केले आहे. प्रशासन कामाला लागले. या सगळ्यात राज्याचा एक मंत्री मात्र या सगळ्या परीस्थितीला सामोरे जाताना दिसला.
तो मंत्री म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे सक्रियपणे सर्वत्र दिसू लागले. आपल्या सोशल मिडिया अकौंटच्या माध्यमातून आणि सतत पत्रकारांच्या संपर्कात राहून त्यांनी सतत जनतेला आश्वस्त करून दिले आहे. अगदी कित्येकदा त्यांनी स्वतः रुग्णालयांना भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राजेश टोपे मंत्री झाले. खरतरं राजेश टोपे यांना मंत्रिपद देण्याऐवजी विधानसभेचे उपसभापती करणार, अशा काहीश्या चर्चा येत होत्या. परंतु ते स्वत: मात्र मंत्रीपदाबाबत प्रारंभापासून निश्चित होते. यापूर्वी राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते.

अभियांत्रिकीचे पदवीधर असलेल्या राजेश टोपे यांनी वयाच्या २३ व्या वर्षी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष या म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यांचे वडील (कै.) अंकुशराव टोपे यांनी ज्याप्रमाणे संघर्ष करीत राजकारण आणि सहकार त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील अस्तित्व निर्माण केले होते, त्यामुळे राजकारणात तेवढा संघर्ष राजेश टोपे यांना करावा लागला नाही.
राजेश टोपे यांना राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात पराभव स्वीकारावा लागला. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी त्यानंतर १९९९ मध्ये राजेश टोपे विधानसभेवर निवडून आले. तेव्हापासून सलग पाच वेळेस त्यांनी ही निवडणूक जिंकली.

१९९९ मध्ये निवडून आल्यावर त्यांनी काही काळ राज्यमंत्रि म्हणून काम केलं. नंतर त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. परंतु मार्च २००१ मध्ये पुन्हा त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आणि त्यानंतर सलगच १४ वर्षे ते मंत्रिपदावर राहिले. जलसंधारण, ऊर्जा, पर्यावरण, नगरविकास, कमाल नागरी जमीन धारणा, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सामान्य प्रशासन, सांसदीय कार्य इत्यादी अनेक खात्यांचा कारभार त्यांनी या काळात सांभाळला.
राज्यात सध्या कोरोना व्हायरसचे संकट असताना आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे म्हणून मोठ्या सक्रीयतेने काम करत आहेत. त्यांच्या या कामाला आमचा सलाम
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम