बाळासाहेबांकडून लतादीदींना राजकारणामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होत
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले.
भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
गोष्ट छोटी-मोठी असू देत बाळासाहेब आवर्जून त्याचं कौतुक करत असत. त्या वेळेस मंगेशकर बंधू-भगिनींनी बाळासाहेबांना एकत्रित असलेल्या श्रीराम-लक्ष्मण-सीता व हनुमान यांची सुंदर रेखीव मूर्ती दिली होती.
त्यावेळेस नेहमीप्रमाणे हसतमुखाने प्रेमाने बाळासाहेबांनी ती स्वीकारली आणि आवर्जून कौतुकाने म्हटलं, “भेट आवडली बरं का ” साहेबांकडे गेलेल्या प्रत्येकाला कौतुकाची थाप ही आवर्जून पडत. आणि काही चुकलं तर ओरडा देखील हे सांगण्याची गरज नाही !
मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबातील सर्वांचे संबंध हे कौटुंबिक सलोख्याचे झाले होते.
लतादीदी आणि बाळासाहेब एकमेकांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांच्या घरी येत-जात असत. बाळासाहेब ज्यावेळेस कलानगर या ठिकाणी त्यांच्या जुन्या घरी राहत होते. त्यावेळेस हृदयनाथ, लतादीदी, आशाताई, उषाताई, मीनाताई असे सारे मंगेशकर बंधू-भगिनी बाळासाहेबांच्या बंगल्यावर गेले होते. त्यावेळेस त्या भेटीचा आनंद दोन्ही कुटुंबांच्या व्यक्तीच्या चेहर्यावर झळकत होता.
गानसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर ह्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे होत्या. बऱ्याचदा नातेसंबंधांमध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरुपात एकमेकांच्या आतून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत असते. सुरुवातीच्या काही भेटीनंतर ज्यावेळेस कौटुंबिक सलोख्याचे नाते निर्माण झाले.
एकदा बाळासाहेबांनी लतादीदींना राजकारणामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
त्यावर लतादीदी म्हणाल्या की, “राजकारण हा आमचा प्रांत नाही, आपण राजकारणात खूप चांगलं काम करताय आपल्याला माझ्या शुभेच्छा…” त्यानंतर कधीही बाळासाहेबांनी राजकारणाचा विषय देखील लतादीदींसमोर काढला नाही हे ही तेवढेच खरे.
शिवसेनेच्या एखाद्या कार्यक्रमाला बोलावल्यास लतादीदी आवर्जून जात असत. एकदा शिवउद्योग सेनेच्या कार्यक्रमांमध्ये लतादीदींना बोलावलं गेलं. लतादीदींनी कार्यक्रमात जाऊन काही गाणी गायली.
तो कार्यक्रम नाही नाही म्हणता आणि श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेण्यात आलेल्या वन्स मोर वन्स मोर म्हणत जवळपास तीन-साडेतीन तास चालला. बाळासाहेबांना त्यातली बरीच गाणी आवडली.
कार्यक्रम संपल्यावर त्यांनी आवर्जून लतादीदींचं कौतुक केलं.शिवसेनेच्या कार्यक्रमात लतादीदींना एक कलाकार म्हणून सन्मान मिळाला . प्रत्येक भेटीमध्ये एक व्यंगचित्रकार कलाकार म्हणूनच बाळासाहेब गानसम्राज्ञी लतादीदी यांना भेटत राहिले.
जेव्हा-जेव्हा बाळासाहेबांना लतादीदींची गाणी ऐकावीशी वाटत तेव्हा तेव्हा राज ठाकरे यांना लतादीदींकडून कॅसेट्स आणण्यासाठी बाळासाहेब पाठवत असत.. अशाप्रकारे बाळासाहेबांची मानलेली भगिनी म्हणून गाणसम्राज्ञी लता मंगेशकर आणि बाळासाहेब यांचे नातेसंबंध आपुलकीचे होते.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम