या सेलिब्रिटींची लग्ने २०२१ या वर्षात गाजली
नेक सेलिब्रिटींना या वर्षात लग्न केली आणि त्यापैकी असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची लग्नं खूपच गाजली.
सामान्य जनताच नाही तर सेलिब्रिटींसाठीही हे वर्ष खास ठरले आहे. अनेक सेलिब्रिटींना या वर्षात लग्न केली आणि त्यापैकी असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची लग्नं खूपच गाजली. या वर्षात गाजलेल्या लग्नांचा एक आढावा घेऊया.
दिया मिर्झा – वैभव रेखी
वैभव आणि दिया दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच निसर्गाचा ऱ्हास होणार नाही आणि वैदिक पद्धतीने दिया मिर्झाने वैभव रेखी याच्यासह लग्नगाठ बांधली. तर त्यानंतर त्वरीतच तिने मुलाला जन्मही दिला. लग्नाआधीच गरोदर राहिल्यामुळे दिया मिर्झावर अनेकांनी टीकाही केली होती. तर आयुष्यात आपण काय करायचा याचा सल्ला इतर कोणीही देऊ नये असं म्हणत टीकाकाराचं तोंड दियाने बंद केलं.
आदित्य सील – अनुष्का रंजन
आदित्य आणि अनुष्काचे लग्नही नुकतेच नोव्हेंबरमध्ये पार पाडले. ग्रॅंड वेडिंग करत या दोघांनी आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली. अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असणाऱ्या अभिनेता आदित्य सील आणि अनुष्का रंजन यांनीही आपल्या चाहत्यांना यावर्षी आनंदाची बातमी देत लग्न केले आहे.
आदित्य धार – यामी गौतम
हिमाचलमध्ये अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आणि केवळ 20 माणसांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केले. सर्वात जास्त सुखद देणारे लग्न ठरले ते म्हणजे यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धार यांचे. ‘उरी’ चित्रपटाच्या या दिग्दर्शकाने बॉलीवूडमधील सुंदर अशा यामी गौतमशी अचानक लग्नगाठ बांधली.
कोणताही गाजावाजा नाही आणि निसर्गाला हानी पोहचेल अशाही कोणत्या गोष्टी न करता एक आदर्श पायंडा या जोडप्याने यावर्षी घालून दिला. मात्र अचानक लग्नाचा फोटो आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मात्र बसला होता.
वरूण धवन – नताशा दलाल
अत्यंत साध्या पद्धतीने आणि तरीही कायम लक्षात राहील अशा पद्धतीने वरूणने नताशाशी लग्न केले. आपली शाळेतील मैत्रीण आणि अनेक वर्ष गर्लफ्रेंड असणाऱ्या नताशा दलालसह यावर्षी वरूण धवनने अलिबाग येथे लग्नगाठ बांधली. कोरोना असल्यामुळे केवळ कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केले.
वरूण आणि नताशा यावर्षी लग्न करणार अशा वावड्या उठत असेपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वरूणने आपल्या चाहत्यांना लग्नाची तारीख कळू दिली नव्हती. वरूणच्या चाहत्यांनीही वरूणच्या लग्नानंतर या दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
राजकुमार राव – पत्रलेखा
समसमान हक्क यावर विश्वास असणारा आणि पत्रलेखाला नेहमीच जपणारा असा राजकुमार याने आपल्या आयुष्यात पत्रलेखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे नेहमीच मान्य केले आणि तिच्याशी लग्नगाठ बांधली. 11 वर्षाच्या सान्निध्यानंतर बॉलीवूडमधील अप्रतिम कलाकार असणाऱ्या राजकुमार राव आणि पत्रलेखा या जोडीनेही नुकतेच लग्न केले आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखाचे फोटो पाहताना आपल्याही आयुष्यात राजकुमार रावसारखाच मुलगा हवा असं अनेक जणींना वाटून गेलं. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि परिवाराच्या उपस्थितीत यावर्षी नोव्हेंबरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
कतरिना कैफ – विकी कौशल
2021 मध्ये लक्षात राहणारा हा लग्नसोहळा असून अखेर सगळ्या अफवांना बंद करत या जोडीने लग्न केले आहे. यावर्षात सर्वात जास्त लग्नाचा गाजावाजा झाला तो म्हणजे #VicKat जोडीचा. अत्यंत गौप्य पद्धतीने राजस्थानमधील जोधपूरमध्ये या जोडीने नुकताच आपला लग्नसोहळा उरकला आहे. निकटवर्तीय आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.
अनेकांनी सोशल मीडियावर या जोडीला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. तर अनेकांनी या जोडीचे मीम्सही तयार केले आहेत. मात्र 38 वर्षीय कतरिनाने 33 वर्षीय विकीशी लग्न करून एक आदर्शच अनेकांसमोर ठेवला असल्याचेही म्हटले जात आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम