Take a fresh look at your lifestyle.

धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईल का ?

0

गायिका रेणू शर्मा यांनी राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. याच प्रकरणावरून मंत्री मुंडे यांनी आपल्या फेसबुकवरून त्याला उत्तरही दिलं आहे. शर्मा यांनी मात्र मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचं म्हटलं आहे.शर्मा यांच्या या आरोपामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत.

यासंदर्भात स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी “आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुले झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत आहोत,” असा खुलासा केला आहे.

उमेदवारी रद्द होऊ शकते ?

विवाहबाह्य संबंधातून झालेल्या अपत्यांची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्यांना आपले नाव दिलेलं असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली आहे. अशा परिस्थितीत या अपत्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात असायला हवा असाही दावा केला जात आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती खरी आणि योग्य असल्याचा दावाही उमेदवाराकडून केला जातो. प्रतिज्ञापत्रात माहिती देत असताना कोणतीही बाब लपवत नसल्याचंही उमेदवाराला सांगावं लागतं. पण असं काही आढळल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकतं. उमेदवार आमदार, खासदार किंवा मंत्री असल्यास ही सर्व पदं रद्द होऊ शकतात.

माहिती दिली नसल्याने अडचणीत येण्याची शक्यता

इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या धनंजय मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी आणि तीन मुलींचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती या रकान्यात तीन मुलींची नावे दिली आहेत. अपत्याच्या कायद्यानुसार दोन अपत्यांमध्ये तिसऱ्या मुलाची भर पडल्यास तो कायद्याने गुन्हा असून अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते.

मुंडे यांनी दुसऱ्या महिलेपासून झालेल्या दोन मुलांची माहिती लपवली आहे. ही मुले 2001नंतर जन्मलेली असतील तर मुंडे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ऑक्टोबर 2019 विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याला विवाहबाह्य संबंधातून दोन अपत्य असल्याची माहिती दिली नसल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही

साल 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंधाबाबत ऐतिहासिक निकाल दिला होता.सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने विवाहबाह्य संबंधाबाबत सुनावणी करताना विवाहबाह्य संबंध अपराध नाही, असं म्हटलं होतं.”पुरूष-स्त्री दोन्ही समान आहेत. विवाहबाह्य संबंधात पती, पत्नीचा मालक होऊ शकत नाही,” असं म्हणत सुप्रीम कोर्टाने विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, असा निर्णय दिला होता.

अमेरिकेतील 21 राज्यात विवाहबाह्य संबंध गुन्हा आहेत.शरीया आणि इस्लामिक कायद्यात विवाहबाह्य संबंध गुन्हा मानले जातात. इराण, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि सोमालियामध्ये हे गुन्हा मानले जाताततैवानमध्ये विवाहबाह्य संबंधाबाबत एक वर्षाची शिक्षा सुनावली जाते. इंडोनेशियातही गुन्हा मानला जातो.यूकेमध्ये विवाहबाह्य संबंधांना गुन्हा मानलं जात नाही. घटस्फोटाच्या मुख्य कारणांपैकी हे एक कारण मात्र असू शकतं.

धनंजय मुंडे यांची राजकीय कारगिर्द

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून काका गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडून धनंजय मुंडे राजकारणात आले. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले.

जून 2010 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची प्रथम निवड झाली. मात्र, सतत राजकीय उपेक्षा वाट्याला आल्याने त्यांनी अखेर 2011मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून 2013मध्ये विधानपरिषदेवर गेले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृह गाजवलं. ते 2019 मध्ये विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे सामाजिक न्यायमंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.