Take a fresh look at your lifestyle.

जया बच्चन थेट दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आल्या होत्या

0

देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी त्यांच्या घरी गणपतीची मूर्ती आणली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. ते म्हणतात ना की, गणपती बाप्पा ला जी काही इच्छा मागितली जाते ती पूर्ण होते.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बॉलिवूडशी संबंधित अशीच एक कहाणी

१९८२ साली शूटिंग च्या सेट वर झालेल्या अपघातानंतर अमिताभ बच्चन घरी पोहोचले तेव्हा जया बच्चन गणपतीच्या दर्शनाला थेट मंदिरात पोहचल्या. असे म्हटले जाते की, कूली चित्रपटाच्या शूटींग दरम्यान घडलेल्या अपघातानंतर अमिताभ बच्चन सुखरूप घरी पोहोचले. तेव्हा जया बच्चन महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेल्या होत्या. जया बच्चन यांनी देवाचे आभार मानले आणि सोन्याचे कानाचे दागिने अर्पण केले.

या घटनेनंतर खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपल्याला हा दुसरा जन्मच जणु मिळाला आहे” असे ते नेहमी म्हणतात. 

१९८२ साली कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ यांना या सिनेमाच्या सेटवर अपघात झाला होता. या सिनेमाचं शूटिंग बेंगळुरूमध्ये सुरू होतं. सेटवरच्या लढतीच्या दृश्यादरम्यान बिग बीं च्या पोटात विलनचा बुक्का जोरात लागला आणि ते  स्टीलच्या टेबलावर आदळले. त्यांच्या  पोटाला गंभीर दुखापत झाली होती.

 या घटनेनंतर सुमारे ७२ तास अमिताभ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही, त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली. अमिताभ यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांची जीवन आणि मृत्यूशी लढाई सुरू झाली. अमिताभला हॉस्पिटलमध्ये सुमारे 2 महिने घालवावं लागलं. जगभरातील लोक मंदिरांमध्ये जाऊन प्रार्थना करू  लागले. 

अमिताभ बच्चन बरे झाले तेव्हा वाटेत घरी जाताना लोक त्यांच्यावर किती प्रेम करतात. हे बिग बींच्या लक्षात आलं होतं. मुंबईतील रस्ते त्यांच्या पोस्टर्सने भरलेले  होते. लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पूजा केली होती. लोकांची अनियंत्रित गर्दी घरी त्यांची वाट पाहत होती. घरी येताच त्यांनी चाहत्यांसोबत हस्तांदोलन केले आणि आपल्या हितचिंतकांचे आभार मानले. या प्रत्यक्ष दृश्याचा उपयोग कुली चित्रपटाचा शेवटचा सीन म्हणून करण्यात आला.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.