सरकार कोणाचेही असो “रामविलास पासवान” त्यामध्ये मंत्री असतातच !
भारत हा असा देश आहे, जिथे सतत कोणत्या तरी निवडणुका असतात. त्यामुळे भारतीय जनतेला चर्चेला कायम विषय उपलब्ध असतात. पुढच्या काही दिवसात बिहार विधानसभा निवडणुक आहे. त्याची चर्चा चालू आहे. या चर्चेत एक नाव आहे, ते कोणत्या बाजूला जाणार यावरून मोठ्या चर्चा सुरु आहेत.
ते नाव म्हणजे रामविलास पासवान. कारण सध्या भाजपसोबत असलेले पासवान भाजपवर नाराज आहेत पण ते ज्या पक्षासोबत जातात, त्या पक्षाची सत्ता येते अस मानल जात.
रामविलास पासवान सध्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. मागील जवळपास ५० वर्षे ते राजकारणात सक्रीय असले तरी सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांचा रेकोर्ड आहे.
पासवान यांना राजकारणातील “मौसम वैज्ञानिक” मानल जात. याला कारण म्हणजे सत्ता कोणाची येणार, याची चाहूल पासवान यांना लवकर लागते आणि ते त्या पक्षासोबत सत्तेत सहभागी होतात.
पासवान यांना “मौसम वैज्ञानिक” का म्हटलं जात ?
- १९७७ साली जनता पक्षाच्या तिकिटावर रामविलास पासवान हाजीपुर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.
- १९८९ मध्ये वी. पी. सिंह यांच्या मंत्रीमंडळात रामविलास पासवान यांना कामगार मंत्री म्हणून संधी मिळाली होती. त्यानंतर ६ पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळात पासवान मंत्री राहिले आहेत.
- १९९६ साली देवगौडा सरकारमध्ये पासवान मंत्री झाले होते. १९९६ ते ९८ पर्यंत पासवान मंत्री राहिले.
- १९९८ साली जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले. तेव्हा पासवान एनडीए मध्ये सामील झाले आणि अटल सरकारमध्ये मंत्री बनले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या
- दुसऱ्या सरकारमध्येपण पासवान मंत्री राहिले.
- २००४ साली देशात कॉंग्रेसचे सरकार आले. मनमोहन सिंह पंतप्रधान झाले. त्या सरकारमध्ये पण पासवान पुन्हा मंत्री झाले. २००९ साली दुसऱ्या सरकारमध्ये पण ते मंत्री झाले.
- मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कॉंग्रेससोबत पासवान यांचे जुळलेले सुत तुटले आणि त्याच वेळी देशात मोदी लाट येत असल्याची हवा पासवान यांनी ओळखली.
- २०१४ साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. पासवान मोदी यांच्या सरकारमध्ये पुन्हा मंत्री बनले. २०१९ ला मोदी २.० मध्ये देखील पासवान यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले आहे. ते आजपर्यंत तरी आहे.
देशाच्या राजकारणाची योग्य दिशा ओळखणाऱ्या पासवान यांनी स्वतःला अनेक पदे मिळवली. २०२४ साली येणाऱ्या निवडणुकीत पासवान पुन्हा काही नवीन दिशा ओळखतील का ? हे पाहावे लागेल
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम