राजकारणात सुसंस्कृत पणाचा आदर्श घालून देणाऱ्या गणपतरावांकडून नव्या पिढीने खूप काही शिकले पाहिजे
२५ ऑक्टोबर २०१४ विधानसभेच्या निकालावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. २०१४ नंतर नरेंद्र मोदी नामक झंजावात देशाच्या राजकारणात तयार झालेला असताना विरोधी पक्षाचे एक एक गढ ढासळत असताना सांगोला मतदार संघात मात्र गढ अभेद्य राहिला होता. तो म्हणजे गणपतराव देशमुख.
सांगोला तालुक्यातील जनतेने गणपतराव देशमुख यांना मतदार संघातून ११ व्या वेळेस संधी दिली होती. १९६२ पासून आजपर्यंत फक्त १९७२-७३ व १९९५ -९९ या दोन वेळचा अपवाद सोडता गणपतराव देशमुख एकाच मतदारसंघातून विजयी होत आलेल्या आहेत. २०१४ चा विजय हा त्यांचा विश्वविक्रमी विजय ठरला.
एकप्रकारे गणपतराव देशमुख हा फक्त एक व्यक्ती म्हणून नाही तर या महाराष्ट्र राज्याचा एक प्रत्यक्षदर्शी इतिहास त्यांच्या रूपाने उभा आहे.
असा म्हणालं तर वावग ठरणार नाही. गेल्या ५५ -६० वर्षात महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय घटनांचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. त्यांच्या या प्रवासात महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या पाउलखुणा सापडतात.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कार्यप्रवणशील माजी मंत्री, विधानसभेतला विरोधी पक्षातला सर्वसामान्य जनतेचा आवाज, अनेकवेळाचे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, सांगोला सहकारी सूतगिरणीचे संस्थापक, सांगोला शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, सांगोल्यातील महिला सूतगिरणीचे संस्थापक, तब्बल ११ वेळा विधानसभा सदस्य त्याहून महत्वाचे म्हणजे पाणी व शेती प्रश्नाचे अभ्यासक
अशी वैशिष्टपूर्ण अशी ६०-६५ वर्षाची राजकीय –सामाजिक कारकीर्द आणि तीही इतक्या वर्षात अंगावर कोणताही भ्रष्टाचाराचा डाग न पडता.
खरतरं आजच्या काळात राजकीय तरुण पिढीने किंवा नव्या राजकीय नेत्यांनी एखाद्या व्यक्तीकडून आदर्श घेवून, राजकारणात उभं रहाव. सत्तेच्या मागे न धावता समाजाच्या कामात स्वतःला झोकून द्याव आणि लोकांसाठी काम करावं. अशी माणस कमी घडताना दिसत आहेत. पण या सगळ्या गोष्टींना गणपतराव देशमुख हे समर्थ उत्तर आहे. अस म्हणता येईल.
राजकारणाविषयी तरुण पिढीला उबग निर्माण होत असताना, राजकीय नेत्यांविषयी सुशिक्षित जनतेच्या मनात घृणा निर्माण होत असताना गणपतराव देशमुख अश्या सगळ्या परिस्थितीमध्ये अंधारात तेवणाऱ्या एखाद्या दिव्याप्रमाणे उजळताना दिसून येतात.
५५-६० वर्षे सत्ता भोगल्यानंतर माणूस अहंकारी होवू शकतो. पण या सत्तेच्या अहंकाराची त्यांना कधीच बाधा झाली नाही. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ते महाराष्टाच्या राजकीय पटलावर ते झळकत राहिले. म्हणून आजही विधानसभेच्या विरोधी बाकावरून गणपतराव बोलू लागेल कि सभागृह शांतपणे ऐकून घेत राहत. ते उगाच नाही.
त्याच्या याच राजकीय घटनाचा आढावा हा महाराष्ट्र तश्या देशातील तरुणांसाठी दिशा देणारा ठरेल. समाजात काही करू पाहणाऱ्या व्यक्तींना हे जीवन प्रेरणादायी ठरेल हे नक्की.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम