Take a fresh look at your lifestyle.

भारतात रंगीत टीव्ही साठी संघर्ष करणारे वसंत साठे

0

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना राज्यातून दिल्लीत निवडून गेलेल्या अश्याच काही खासदारांचे किस्से

भारतात रंगीत टीव्ही साठी संघर्ष करणारे वसंत साठे

वसंत साठे नभोवाणी मंत्री होते आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे रंगीत टिव्ही सुरु झाले असं म्हणता येईल. किस्सा असा होता कि तेव्हा ब्लॅक व्हाईट टीव्ही होते. भारतात एशियाड स्पर्धा होणार होत्या. त्याचे प्रक्षेपण रंगीत करायचं असा वसंत साठे यांनी ठरवले. तसा प्रस्ताव देखील त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मांडला. पण त्यावेळी उपलब्ध असलेल्या दूरदर्शनच्या मनोऱ्यावरून रंगीत प्रक्षेपण करताच येणार नाही, अस सांगण्यात आले.

पण वसंत साठे आग्रही होते. त्यांनी प्रयत्न सुरु केले. त्यावेळी फक्त दूरदर्शन हेच एकमेव चॅनल होते आणि तेही २४ तास चालणारे नव्हते. ते रात्री ११ वाजता बंद व्हायचे. वसंत साठे यांनी रात्री ११ नंतर रंगीत प्रक्षेपण करून बघायचे ठरवले. रात्री ११ नंतर रंगीत प्रक्षेपण करण्यात आले.

शेवटी साठे यांच्या प्रयत्नाला यश आले. खरंतर दूरदर्शनच्या रंगीत मनोऱ्यावरून प्रक्षेपण शक्य आहे. हे दाखवण्यासाठी वसंत साठे यांनी बरेच प्रयत्न केले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि खासदारांना रंगीत प्रक्षेपण शक्य आहे हे दाखवण्यासाठी संसद भवनाच्या सेन्ट्रल हॉल मध्ये दोन रंगीत टीव्ही बसवण्यात आले आणि इंदिरा गांधी यांच्या एका कार्यक्रमाचे रंगीत प्रक्षेपण करण्यात आले.

त्यासोबत देशभर रंगीत टीव्हीच्या अॅन्टेनासाठी देखील साठे यांनी मोठा संघर्ष केला. दळणवळण खात्याच्या खांबावर देशभर अॅन्टेना बसवण्यात आले आणि देशभरात रंगीत कार्यक्रम दिसू लागले. तसं पाहता गेल तर त्याकाळी रंगीत प्रक्षेपण हि ऐतिहासिक कामगिरी होती, एवढ नक्की. त्याच सार श्रेयही वसंत साठे यांनाच जात.

वसंत साठे १९७१ आणि १९७७ साली अकोला मतदारसंघातून निवडून आले होते. तर १९८०, १९८४ आणि १९८९ साली वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पहिले.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.