Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांनी मुलीच्या नावाने वर्गमित्राला पत्र लिहिलं ; सुशीलकुमार यांनी सांगितलेला तो किस्सा

एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार आपल्या महाविद्यालयीन जीवनात कसे खोडसाळ होते, याचा एक किस्सा सांगितला.

0

शरद पवार हे पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. तर शरद पवार हे आपले राजकीय गुरू असल्याचंही, असं सांगत सुशीलकुमार यांनी ‘ती मुलगी आणि शरद पवार’ यांचा तो खोडसाळपणाचा किस्सा सर्वांना ऐकवला. हा किस्सा सांगितल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झालेला आहे.

पुण्यात बीएससीसी कॉलेजच्या ग्राऊंडवरील एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार आपल्या महाविद्यालयीन जीवनात कसे खोडसाळ होते, याचा एक किस्सा सांगितला.

सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले होते, शरद पवार हे आतापासून नाही तर ते कॉलेज जीवनापासूनच खोडकर आहेत. शरद पवारांचा खोडकर आणि मिश्किलपणा नेहमी चर्चेत राहत होता. शरद पवारांचा खोडकरपणा अजूनही गेला आहे, असं तुम्ही समजून घेऊ नका, असंही असं सुशीलकुमार विनोदाने आणि आवर्जुन सांगत होते.

शरद पवार जेवढे सामाजिक दृष्टीकोनातून, राजकीय दृष्टीकोनातून गंभीर आहेत, तेवढेच ते विनोदबुद्धीने जगतात, खेळकर आहेत, खोडकर आहेत, खिलाडूवृत्तीने वागणारे आहेत, कला-साहित्याचे पुजक आहेत, कुस्तीचेही पुजक आहेत, असं सुशीलकुमार यांनी त्या कार्यक्रमात एकदा सांगितलं होत .

जेव्हा सुशीलकुमार भरकार्यक्रमात शरद पवारांकडे पाहून म्हणाले

सुशीलकुमार यांनी त्या मुलीचा तो मिश्किल किस्सा, एकदा शरद पवारांकडून वदवून घेतला की, ‘नेहमी ऐकला जातो तो किस्सा खरा आहे का?’ मग शरद पवारांच्या उपस्थितीत सुशीलकुमार शिंदे यांनी हा किस्सा जाहीरपणे ऐकून दाखवला. जेव्हा सुशीलकुमार भर कार्यक्रमात शरद पवारांकडे पाहून म्हणाले, ‘एक मुलगा होता, तो आपल्या बरोबरच्या, कॉलेजमधील मुलीवर खूप प्रेम करत होता.’

सुशीलकुमार यांनी हे एक वाक्य म्हटल्याबरोबर सांगितल्याबरोबर, अनेकांनी शरद पवारांकडे रोख वळवला, तेव्हा शरद पवारांनी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.

‘तुम्ही समजताय, तसं काही नाही, तर शरदरावांच्या बरोबर, वर्गात एक मुलगा होता, त्याचं एका मुलीवर खूप प्रेम होतं, आणि पवारांनी यात नेमकं काय केलं’… त्याचा हा किस्सा सुशीलकुमार यांनी सांगितला.

शरद पवारांसोबतच्या त्या मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम होतं, तो तिच्यासमोर आपलं प्रेम मांडण्यासाठी अनेक गोष्टी करत होता. तो अनेक वेळी त्या मुलीला पत्र लिहित होता, पण ती मुलगी ते पत्र फाडून फेकून देत होती. त्यामुळे या मुलाला कोणतंही उत्तर त्या बाजूने मिळत नव्हतं.

मग शरद पवारांनी एकदा त्या मुलीच्या नावाने या वर्गमित्राला पत्र लिहिलं. पत्रात त्याला पुण्यातील एका सिनेमा हॉलजवळ रविवारी सायंकाळी भेटण्याची वेळ लिहून दिली. तो गडी जाम खूश झाला.

काय आली की नाही ती अजून?

रविवारी ठरलेल्या वेळेवर तो युवक त्या ठिकाणी जावून बसला, दीड-दोन तासांनीही ती मुलगी तिकडे फिरकत नाही असं दिसल्यावर, शरद पवार हळूच त्याच्या बाजूला जावून बसले, आणि त्यांनी मित्राला विचारलं, काय आली की नाही ती अजून?

पवारांचा हा मित्र काय समजायचं ते समजून गेला आणि हळूच त्या ठिकाणाहून शर्मेने लाल होत परतला. पवारांचा हा खोडकर किस्सा ऐकल्यानंतर कार्यक्रमात खसखस पिकली.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.