Take a fresh look at your lifestyle.

एकही निवडणूक न हरलेले शरद पवार निवडणूक हरतात तेव्हा

0

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या नावाचा चांगलाच दबदबा आहे. गेली जवळपास पन्नास वर्षे शरद पवार राजकारणात सक्रीय आहेत. आपल्या राजकीय जीवनात शरद पवार तब्बल १४ निवडणुका जिंकेलेले आहेत. विधानसभा असो किंवा लोकसभा असो अश्या सगळ्या निवडणुका ते जिंकलेले आहेत, पण हेच शरद पवार एक निवडणूक मात्र हरले होते. अशी कोणती निवडणूक होती ? ज्यात शरद पवार हरले. तुम्हाला माहित आहे का ?

राजकारणासोबतच शरद पवार खेळाच्या मैदानात देखील खूप काळ सक्रिय राहिलेले आहेत. क्रिकेटच्या मैदानात नाही पण क्रिकेटच्या मैदानाबाहेरील खेळात शरद पवार यांना खूप यश मिळाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळावर देखील ते अध्यक्ष राहिले. पण याच क्रिकेटच्या मैदानाबाहेरील खेळात पवार यांना एक पराभव स्वीकारावा लागला होता.

शरद पवार यांचा पराभव झाला पण हि निवडणूक राजकीय निवडणूक नव्हती तर ती निवडणूक होती क्रिकेटची. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ची. किस्सा आहे २००४ सालचा. २९ सप्टेबर २००४ रोजी BCCI च्या अध्यक्ष पदासाठी कोलकाता येथे निवडणूक होणार होती. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत शरद पवार याच्या विरोधात उमेदवार होते ‘रणबीर सिंग महेंद्र’. रणबीर सिंग महेंद्र हे हरियाना क्रिकेट संघाचे अध्यक्ष होते.

रणबीर सिंग महेंद्र

२९ सप्टेबर २००४ रोजी पहिल्यांदा BCCI च्या अध्यक्ष पदासाठी मतदान पार पडले. त्यात शरद पवार यांना १५ तर रणबीर सिंग महेंद्र यांना १४ मते मिळाली होती. यावर तुम्ही म्हणाल शरद पवार यांचा विजय झाला पण इथूनच खरा किस्सा सुरु होतो. BCCI चे तेव्हाचे अध्यक्ष होते जगमोहन दालमिया.

दालमिया यांचे BCCI वरती वर्चस्व होते. त्यांना ते गमवायचे नव्हते. त्यामुळे रणबीर सिंग महेंद्र हे खरे तर दालमिया यांचेच उमेदवार होते. त्यामुळे निवडणुकीत १५-१४ अशी शरद पवारांना आघाडी मिळाल्याने दालमिया यांनी आपले डावपेच खेळायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी मावळते अध्यक्ष म्हणून मतदान केलं आणि रणबीर सिंग महेंद्र यांच एक मत वाढवलं. त्यामुळे निकालात १५-१५ अशी बरोबरी झाली.

जगमोहन दालमिया : शरद पवार यांच्या पराभवामागे खरी खेळी यांनी खेळली

निकालात बरोबरी होताच आपल्या अध्यक्षपदाचा विशेषाधिकार वापरून दालमिया यांनी आणखी एक मत रणबीर सिंग महेंद्र यांच्या बाजूने केलं. त्यामुळे जेव्हा अंतिम निकाल लागला तो १५-१६ असा. रणबीर सिंग महेंद्र यांना १६ मते मिळाली आणि निवडणुकीत ते विजयी झाले.

आपल्या राजकीय जीवनात अनेकांना धोबीपछाड देणाऱ्या शरद पवार यांना क्रिकेटच्या मैदानात मात्र जगमोहन दालमिया यांच्यामुळे असा एक पराभव स्वीकारावा लागला होता.

कारण या निवडणुकीत एकट्या दालमिया यांनी ४ वेळा मतदान केले होते, ते कस काय? तर बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि नॅशनल क्रिकेट क्लब या दोन्हीचे प्रतिनिधी म्हणून दालमिया यांनीच मतदान केले होते आणि नंतर मावळते अध्यक्ष म्हणून आणि बरोबरी झाल्यानंतर अध्यक्षपदाचा विशेषाधिकार म्हणून आणखी एक मत अशी चार मते दालमिया यांनी केली होती. त्यामुळे पवारांचा पराभव झाला.

जगमोहन दालमिया आणि शरद पवार

अर्थात या पराभवाची परतफेड शरद पवार यांनी एकाच वर्षात केली नोव्हेंबर २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पवार यांनी रणबीर सिंग महेंद्र यांचा २०-११ असा पराभव केला आणि BCCI मधील दालमिया यांचे वर्चस्व देखील संपुष्ठात आणले. पुढे शरद पवार यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद देखील मिळवले. पण दालमिया यांच्यामुळे शरद पवार यांना त्यांच्या आयुष्यात एकमात्र पराभव स्वीकारावा लागला.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.