Take a fresh look at your lifestyle.

स्वतः शरद पवारांनी स्वतःच्या हेलिकॉप्टर अपघाताचा किस्सा सांगितला आणि…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताचा एक जुना पण थरारक किस्सा सांगितला आहे.

0

दोन दिवसापूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये देशाचे सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताचा एक जुना पण थरारक किस्सा सांगितला आहे, तेव्हा शरद पवार यांनी पायलटला सांगून कसं प्रसंगावधान राखलं आणि या संकटातून सहीसलामत बाहेर पडले.

हा किस्सा शरद पवार यांनी आज थरारक किस्सा सांगितला आहे.

तामिळनाडूत संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले आहे. या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना अतिशय धक्कादायक, चिंताजनक आणि दु:खदायक असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळचा हा किस्सा आहे. त्यावेळी एकदा पवार पुण्याहून मुंबईला चालले होते.

मध्ये लोणावळा-खंडाळा येथे एक खोल दरी आहे. आसपास उंचच उंच डोंगर आहेत. प्रवासादरम्यान सोसाट्याचा वारा सुटला. ढगही मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. खाली दूरपर्यंत जंगल होते. डोंगरच दिसत होते. ढगही मोठ्या प्रमाणात होते आणि हवेचा दाबही वाढत होता.

अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरचा पायलट काहीसा गडबडला. हेलिकॉप्टर पुढे जातच नव्हते आणि पुढचे काही दिसतही नव्हते. मात्र त्यावेळी तातडीने एक गोष्ट पवार यांच्या लक्षात आली.

आजूबाजूला उंचच उंच डोंगर आहेत, जर हेलिकॉप्टर आदळलं तर हा शेवटच आहे.

‘यात पायलट गडबडला. हेलिकॉप्टर काही पुढे जाईना. पुढचं काही दिसेना. तातडीनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आजूबाजूला डोंगर आहेत, पहाड आहेत, येथे आजूबाजूला हेलिकॉप्टर आदळलं, तर हा शेवट आहे.

पुढे पवारांनी अस सांगितलं कि  ‘पण मला, आपल्याला महाराष्ट्राची ज्याची आपल्याला सर्वांना माहिती आहे. लहानपणी आपल्याला शिकवलं जातं की, कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे.’

‘कळसूबाईची शिखर ज्याची उंची ५ हजार फुटांपेक्षा जास्त आहे. तेव्हा मी पायलटला सांगितलं, हेलिकॉप्टर ७ हजार फुटांवर तू घे. यानंतर ७ हजार फुटांवर गेल्यानंतर हे हेलिकॉप्टर कुठे आदळायची शक्यता नव्हती. यानंतर आम्ही या संकटातून सुखरुप बाहेर पडलो.’

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.