Take a fresh look at your lifestyle.

शरद जोशी : “भारत आणि इंडिया” मधील दरी मांडणारा नेता

शेतकरी, महिला, तरुण यांना शेतीचं आर्थिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देणारी शरद जोशींची शेतकरी संघटना कृषी क्षेत्रातील ज्ञानी माणसाची कार्यकर्ता फळी असलेली ती एकमेव संघटना असेल.

0

शेतकरी वर्गाचा नेता कोण तर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी असं आपसूकच लोकांच्या तोंडी येऊन जात. शरद जोशींसारखा शेतीविषयक वैश्विक आणि शाश्वत विचार कदाचित कोणी मांडू शकत असेल यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

देशातील सामान्य आणि कायम पिटलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी ज्या व्यक्तीने स्वीझर्लंडमधील सुखी आयुष्याला तिलांजली दिली. ८० च्या दशकांत जोशींनी संपूर्ण महाराष्ट्र आणि नंतर पूर्ण देश पिंजून काढला आणि जीन्स, टी –शर्ट वरचा हा माणूस मातीसाठी आयुष्य झिजवणाऱ्या सामान्य शेतकरी वर्गाचा नेता झाला हे नियतींचं देणं होतं.

शेतकरी, महिला, तरुण यांना शेतीचं आर्थिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देणारी शरद जोशींची शेतकरी संघटना कृषी क्षेत्रातील ज्ञानी माणसाची कार्यकर्ता फळी असलेली ती एकमेव संघटना असेल.

शरद जोशी यांनी त्यांच्या विविध भाषणांतून आणि पुस्तकातून भारतातील आर्थिक दरीचा म्हणजे ‘इंडिया आणि भारत’हा फरक स्पष्ट केला होता.

तो फरक आता कोरोनच्या संकटात आपल्याला स्पष्ट दिसत आहेत . इंडिया विमानाने विदेशातून भारतात येत होता आणि भारत रस्त्यावर चालून त्यांच्या गावी निघाला होता . हा फरक आता सर्व देशातील जनतेन अनुभवला किंवा स्पष्ट दिसला आणि तो भारताने भोगला देखील

भारत आणि इंडिया मधील ‘ते स्वातंत्र्य खरे नव्हे’

शरद जोशी यांच्या मते कल्याणकारी राज्य आणि कल्याणकारी अर्थशास्त्र या दोन्ही वेगळ्या आर्थिक संकल्पना शरद जोशींना अमान्य होत्या. सरकारच्या आडमुठ्या किंवा अतिसहभागी भूमिकेमुळे , जनतेची जबाबदारी घेण्याची आस्था दुर्बल होऊन जाते. जनता अन्न आणि आर्थिक मदतीसाठी सतत मायबाप सरकारकडे आशा लावून बसलेली आढळते.

आता नुकत्याच मोदी सरकारने कोरोनाच्या संकटात दिलेल्या अन्नधान्य योजनेचा फायदा हा आधार कार्ड धारकांना थेट मिळावा अशी सोय केली गेली पण अनेक चुकीच्या मार्गाने याचे वाटप झाले. परराज्यातून आलेल्या कामगारांना आणि अशिक्षित व असंघटित लोकांना सरकारने अशी काही उपलब्धता केली होती यांची जाणीव देखील झाली नसेल.

भारतातील जनतेची हेळसांड आपण विविध भारतातील रस्त्यावर चालताना इंडियाने उघड्या डोळ्याने पाहिलीच आहे. आत्मसन्मान, गुलामी, भ्रष्टाचार आणि मृत्यूला सामोरे जाण्याची भारताने कायमच घेतली आहे.

इंडियाच्या हस्तक्षेपाची बाजारपेठ

शेतमाल विक्रीत सरकारी यंत्रणा आणि व्यापारी यांचा हस्तक्षेप नसावा कारण कोरोनाच्या संकटात बाजारपेठ बंद असताना शेतकऱ्याकडून पडत्या भावाने विकत घेऊन किती महागाईने विकलं हे एका फोनवर शहरी मंडळींकडून आपल्याला समजेल. खुली बाजारपेठ हि कृषी क्षेत्राला दिशा देऊ शकते असा शरद जोशींचा विचार होता. त्यामुळे नवदीच्या उदारीकरण – खाजगीकरण – जागतिकीकरण या आर्थिक धोरणाला त्यांनी खुला पाठिंबा दिला होता.

खुल्या अर्थव्यवस्थेचा भाग हा जनतेला नवी दिशा देणारा आहे असा त्यांचा विश्वास आज खरा ठरत आहे.

शरद जोशींच्या मते, बाजारपेठेच्या व्यवस्थेत उत्पादन वाढ करून उपभोग वाढवण्यासाठी धडपड सुरू असते ही कल्पनाच मुळात अतिशय चुकीची आहे. धडपड फक्त उपभोगता वाढवण्याची नसून, तर त्यामध्ये वैविध्य आणि विपुलता वाढवण्याची आहे.

तिचा उद्देश लोकांना आपल्या आवडीचं आणि निवडीचं खुलं स्वातंत्र्य देणारा आहे. प्रत्येक वेळी नुसता उपभोगच असेल तर तो अपरिहार्य आहेच. शेवटी गुरं ढोरं देखील उपभोग घेतातच की आणि माणसही घेतात. मग दोघांमध्ये नक्की फरक तो कोणता ? माणसाची बुद्धी निसर्गापलीकडे जाऊन उपभोग घेणारी आहे

आज शरद जोशी असते तर

खुल्या अर्थव्यवस्थेचे धडे देणार हे विद्यापीठ आज असते तर आज शेतकरी वर्गावर एवढ्या वाईट वाताहतीची वेळ आलीच नसती.

शरद जोशींनी आजमितीला पुन्हा सगळ्या फूट झालेल्या चळवळीची मोट बांधून सर्वाना एकत्र बांधून व्यवस्थेच्या विरोधात आणि बळीराजला आत्मनिर्भरता आणण्यात यश मिळवून दिले असते.

मुळातच आज पुन्हा शरद जोशींच्या विचाराला समोर ठेवून एकत्र होण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ती शरद जोशी असते तर नक्की साध्य झाली असती, देशातील इंडिया विरुद्ध भारताची जी दरी शरद जोशी कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केलाच असता आणि कृषी क्षेत्राला नवी उभारी दिली असती.

  • रितेश पोपळघट

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.