Take a fresh look at your lifestyle.

क्राईम रिपोर्टर असलेले संजय राऊत सामनाचे संपादक कसे झाले ?

लोकप्रभा साप्तहिकाचे क्राईम रिपोर्टर ते शिवसेनेच्या मुखपत्राचे, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा प्रवास राहिला.

0

संजय राऊत यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात आली. सुजित पाटकारांचा थेट संबंध संजय राऊतांशी जोडत कोव्हिड घोटाळा केल्याचा आरोप लावला जातोय आता तर राऊतांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईविरोधात राऊत आणि त्यांची टीम एकटी पडली असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून वारंवार केला जातोय.

कारण शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा एकही मोठा नेता स्पष्ट भूमिका घेत नाही त्यामुळे विरोधक देखील राऊतांना एकटं समजू लागले आहेत. पण संजय राऊत यांचा नेमका राजकीय प्रवास कुठून सुरु झाला हे आपण या लेखात बघणार आहोत.

२०१९ विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आणि सत्तेसाठी नवी गणितं आखली जाऊ लागली. शिवसेनं भाजपची युती तोडत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीनं वेगळी चुल मांडण्याचा निर्णय घेतला.

याला कारण होतं “मुख्यमंत्री आमचाच होणार’ ही शिवसेनेची मागणी.

ही मागणी लावून धरली होती संजय राऊतांनी.

दैनिक सामनाच्या कार्यकारी संपादकांनी. राऊतांचे ट्वीट्स आणि मुलाखती सत्तास्थापनेची चुरस वाढवत होत्या. माध्यमांसमोर येत त्यांनी वारंवार कलमेने शाब्दिक वार केले. विरोधकांना घायाळ करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

क्राईम न्यूज यायच्या पण केवळ बातम्या म्हणून

शिवसेनेचे जेष्ठ नेते, राज्यसभा खासदार आणि शिवसेनेचा दिल्लीतला शिलेदार अशी संजय राऊतांची ओळख आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील एका गावात 15 नोव्हेंबर 1961 या दिवशी संजय राऊत यांचा जन्म झाला. आवश्यक शिक्षण घेतल्यावर संजय राऊत हे ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकासाठी लिहायला लागले.

त्यांच्या लेखणीची सुरुवात साप्ताहिक लोकप्रभातूनच झाली. त्या काळात सर्व मराठी दैनिकांतून गुन्हे वृत्त (क्राईम न्यूज) यायच्या पण केवळ बातम्या म्हणून. विशेष अशी क्राईम स्टोरी कोणी कव्हर करत नसे. संजय राऊत यांनी ती सुरुवात केली.

‘इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकात मार्केटींग विभागात काम करत असत

साप्ताहिक लोकप्रभामध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत. त्या काळात संजय राऊत यांनी लिहिलेल्या क्राईम स्टोरी प्रचंड गाजल्या. संजय राऊत हे सुरुवातीला ‘इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकात मार्केटींग विभागात काम करत असत. पुढे ते साप्ताहिक लोकप्रभा मध्ये रुज झाले. सूत्रांकडून अचूक माहिती काढणं. ती महिती बातमीत योग्य शैलित आणि शब्दांत मांडणं हे संजय राऊत यांचे खास वैशिष्ट्य होते.

१९९३ साली त्यांच्याकडे सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी आली

जुन्या, जाणत्या लोकांमध्ये त्या आजही स्मरणात आहेत. त्या काळात शिवसेना राजकारणात हातपाय मारत होती. व्यंगचित्रकार असल्याने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांचे समाजातील विविध घटना, घडामोडींवर बारीक लक्ष असायचे. खास करुन महाराष्ट्रात लिहिल्या, छापल्या जाणाऱ्या गोष्टींवर.

लोकप्रभा साप्तहिकाचे क्राईम रिपोर्टर ते शिवसेनेच्या मुखपत्राचे, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा प्रवास राहिला. १९९३ साली त्यांच्याकडे सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी आली.

साप्ताहिक लोकप्रभातून छापून येणाऱ्या लेखांमधून संजय राऊत हे शिवसेनेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचे बाळासाहेबांना वाटत असे. तेव्हाच संजय राऊत हे बाळासाहेबांच्या नजरेत बसले होते.

1989 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना नावाचे दैनिक सुरु केले. त्या वेळी अशोक पडबिद्री हे सामनाचे कार्यकारी संपादक होते. 1993 मध्ये ही जागा संजय राऊत यांनी घेतली आणि ते सामना दैनिकाचे कार्यकरी संपादक झाले

सिनेमातही रुची

२००४, २०१० आणि २०१६ या तिन टर्ममध्ये त्यांना सेनेकडून राज्यसभा मिळाली. पत्रकार आणि राजकारणी असा संगम त्यांच्यात पहायला मिळतो पण त्यांची इतकीच ओळख पुरेशी नाही. त्यांनी सिनेमातही रुची घेतली. २०१९ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन प्रवासावर ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच लेखन त्यांनी केलं आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.