इंजिनियर असलेल्या पृथ्वीराज बाबांनी भारतात संगणकाचं मोठं तंत्रज्ञान आणल
८० च दशक होत. याच काळात भारतात कॉम्प्युटर्स येऊ लागले होते. राजीव गांधी राजकारणात सक्रीय होत होते . राजकारणात सक्रिय झाल्यावर त्यांनी या क्षेत्राला चालना देण्याची भूमिका घेतली होती.
येणारं शतक हे कॉम्प्युटरच असणार हे स्पष्ट झाल होत. हा काळ म्हणजे अमेरिकेत आयटी इंडस्ट्री आकार घेत होती. स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स यांच्यासारखी तरुण मंडळी वेगवेगळे प्रयोग करत होते.
राजीव गांधी यांची संगणक क्षेत्रासंदर्भात एका कामातून पृथ्वीराज चव्हाणांशी भेट झाली. उच्चशिक्षित तरूणांनी राजकारणात यावे ही राजीव गांधींची भूमिका होती. त्यांच्या आग्रहामुळे पृथ्वीराज चव्हाणांनी पहिली निवडणूक लढवली आणि तिथून मात्र त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.
पण त्याआधी पृथ्वीराज चव्हाण (बाबा ) यांचे आयष्य कसे होते
चव्हाण यांनी कराडयेथील एका स्थानिक नगरपालिका मराठी माध्यमाच्या शाळेत शालेय शिक्षण सुरू केले. वडील दिल्लीला गेल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीतील नूतन मराठी शाळेत दाखल झाले. चव्हाण यांनी पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली(बिट्स पिलानी ).
१९६७ साली पदवी भेटल्यानंतर त्यांनी जर्मनीत युनेस्कोची शिष्यवृत्ती मिळवली आणि नंतर बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. त्यांनी कम्प्युटर सायन्सवर अनेक लिहिले आहेत आणि रिसर्च केली आहे ; अभियांत्रिकी रचना; तसेच कम्प्युटरायझेशनमध्ये संशोधनातही योगदान दिले आहे.
डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स, पाणबुडीविरोधी युद्ध, संगणक साठवण प्रणाली आणि भारतीय भाषांचे संगणकीकरण यावरही त्यांनी अमेरिकेत डिझाइन इंजिनीअर म्हणून काम केले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांना जाणवल की या मशिनची भाषा जर भारतीय बनली तर आपल्या देशातील अनेकजणांना तो वापर करणे सोपे होऊन जाईल. सर्व प्रथम त्यांनी हिंदी भाषेतील कॉम्प्युटर बनवण्याचा प्रयत्न केला.
मात्र यासाठी प्रचंड खर्च लागणार होता .त्यामुळे त्यांनी या ऐवजी आहे त्याच कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये काही बदल करून तो आपल्या मातृभाषेत वापर करण्यास योग्य आहे हे जास्त सोप ठरेल असे त्यांना जाणवले. पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या टीमने एक सर्किट बनवलं. ते आयबीएम व त्याकाळच्या प्रचलित कॉम्प्युटरवर बसवलं.
यामुळे फक्त हिंदीच नाही तर मराठी व इतर प्रादेशिक भाषांमध्ये कॉम्प्युटर वापरता येऊ लागले. त्याकाळी अनेक संगणकांवर ही प्रणाली बसवण्यात आली होती.
पृथ्वीराज चव्हाणांना अमेरिकेत खूप संधी या क्षेत्रात होत्या. पण त्यांनी आपल्या देशात परत जाण्याचा निर्णय घेतला. एकतर त्यांच्या वडिलांची खालावलेली तब्येत हे एक कारण होतं शिवाय आपण जे शिकलो त्याचा आपल्या देशाला, आपल्या मातीला फायदा व्हावा. ही देखील त्यांची एक इच्छा होती.
मग ते भारतात परतले आणि त्यांनी दिल्लीमध्ये ॲप्लाइड इलेक्ट्रो मॅग्नेटिक्स नावाची कंपनी स्थापन केली. पृथ्वीराज चव्हाण व त्यांचे काही मित्र या कंपनीत संरक्षण क्षेत्रातील उपकरणे बनवण्यासाठी काही मुलभूत संशोधन करू लागले.
त्यानंतर राजीव गांधी यांची संगणक क्षेत्रासंदर्भात एका कामातून पृथ्वीराज चव्हाणांशी भेट झाली.आणि त्यांनी त्यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला.
पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. पण शेवटी एवढच की मराठी भाषा संगणकावर आणण्याचं श्रेय इंजिनियर पृथ्वीराज चव्हाण यांना जाते.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम