कमला हॅरिस यांचे फक्त भारतीय वंशाच्या म्हणूनच नाहीतर पहिल्या महिला उपराष्ट्रपती म्हणून कौतुक करायला पाहिजे
अमेरिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून जो बायडन नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. बायडन यांच्यासोबत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष असणार आहेत.
कमला हॅरिस यांनी जानेवारी 2019 मध्ये अमेरिकन निवडणुकांसाठी राष्ट्रपती पदाची तयारी सुरू केली होती. पण नंतर या वर्षाच्या सुरुवातीला कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदासाठी जो बायडन यांचे समर्थन केले. परंतु बायडन यांचे प्राथमिक आणि पूर्व-प्राथमिक हंगामात चांगले संबंध नव्हते. आता गेल्या काही महिन्यांत पुन्हा एकदा ते मित्र म्हणून उदयास आले आणि बायडन यांनी कमला यांना उपराष्ट्रपती म्हणून जाहीर केले.
कमला हॅरिस अमेरिकेची उपराष्ट्रपती होणारी पहिली महिला आणि पहिली भारतीय-अमेरिकन वंशाची व्यक्ती आहे.
कमला हॅरिस यांचे वडील डोनाल्ड हॅरिस जमैका देशाचे नागरिक होते तर त्यांची आई श्यामला गोपालन भारतीय असून मुळच्या केरळच्या आहेत. श्यामला कॅन्सर संशोधक आणि चेन्नईमधील नागरी हक्क कार्यकर्ते होत्या. 2009 मध्ये त्याच्या आईचे निधन झाले. त्याचे वडील अजूनही स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकवतात.
पालकांच्या घटस्फोटानंतर कमला हॅरिस यांना त्यांच्या भारतीय आईनेच वाढवले. म्हणून कमला हॅरिस यांच्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. परंतु यासोबच त्यांनी आफ्रिकन-अमेरिकन परंपराही जपल्या. आपल्या आईबरोबर कमला यांनी अनेकदा भारतातही प्रवास केला आहे.
कमला हॅरिस यांचे बालपण अमेरिकेतील ऑकलंडमध्ये गेले. यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून बॅचलरची डिग्री मिळविली. तर कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. कमला हॅरिस यांनी काही कला सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जिल्हा अॅटर्नी म्हणूनही काम केले आहे. 2003 मध्ये ती सॅन फ्रान्सिस्कोची जिल्हा अॅटर्नी होत्या.
2017 साली कॅलिफोर्नियामधून कमला यांनी अमेरिकेच्या सिनेटचा सदस्य म्हणून शपथ घेतली. असे करणारी ती दुसरी कृष्णवर्णीय महिला होती.
त्यांनी होमलँड सिक्युरिटी अँड गव्हर्नमेंट अफेयर्स कमिटी, इंटेलिजेंस सिलेक्ट कमिटी, ज्युडिशियल कमिटी आणि बजेट कमिटीवरही काम केले. मागच्या वर्षापर्यंत कमला हॅरिस अध्यक्षीय उमेदवाराच्या शर्यतीत होत्या परंतु पाठिंबा नसल्यामुळे या शर्यतीतून त्या बाहेर पडल्या.
कमला हॅरिस यांची निवड करताना जो बायडन यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटले होते की “मला कमला हॅरिस यांची निवड माझ्या उपराष्ट्रपती पदाची उमेदवार म्हणून निवडण्यात आल्याचा मला अभिमान आहे.” बिडेन यांनी कमला यांचे वर्णन एक शूर योद्धा आणि अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट नोकरशहा असल्याचे केले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम