अपमानाचा बदला म्हणून जमशेदजी टाटा यांनी “ताज हॉटेल”ची निर्मिती केली
तुम्ही जर कधी पहिल्यांदा मुंबई ला गेला. त्यावेळी तुम्ही मुंबई मधील “गेट वे ऑफ” नक्की भेट देता. त्यावेळी त्याच गेट वे ऑफ इंडिया समोरील हॉटेल ताज कडे तुम्ही नक्कीच पाहता. हे हॉटेल भारताची एक खास ओळख म्हणुन देखील पाहीले जाते.
ताज हॉटेलची चर्चा फक्त आपल्याच देशात नाहीतर विदेशात देखील होते. या हॉटेलची मालकी टाटा उद्योग समूहाकडे आहे. आजघडीला ताज हॉटेलच्या 99 ब्रांचेस आहेत यातले 83 हॉटेल भारतात आहेत आणि 16 हॉटेल लंडन, अमेरिका, साऊथ आफ्रिका आणि इतर देशांत आहेत.
ताज हॉटेलची सुरुवात 1903 ला जमशेदजी टाटा यांनी केली होती.
पण या हॉटेलच्या सुरुवात करण्यामागे एक खुप इंटरेस्टिंग किस्सा देखील सांगितला जातो. असं म्हणतात जमशेदजी टाटा मुंबईच्या वैटसन्स हॉटेल मधे थांबण्यासाठी गेले, पण त्यावेळी त्यांना हॉटेलच्या आतसुद्धा येऊ दिले नाही. याच कारण म्हणजे त्या हॉटेलच्या गेट वर एक बोर्ड होता ज्यावर लिहिलेले होते की,
“कुत्र्यांना आणि भारतीयांना प्रवेश निषिद्ध आहे”
जमशेदजी टाटा यांना ज्यावेळी हि बाब समजली. त्यावेळी त्यांना याचा खूप राग आला आणि जमशेदजी टाटा यांनी बदला म्हणून स्वताचं एक भव्य हॉटेल बांधायचा विचार केला आणि त्याची सुरुवात 16 डिसेंबर 1903 ला केली गेली.
टाटा यांच्याकडून जेव्हा या हॉटेलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, तेव्हा त्याच्या सुंदरतेसमोर वैटसन्स सारखे कित्येक विदेशी हॉटेल्स फिके पडले. याच सुविधांना बघुन लोकांनी ताज हॉटेल ला “ग्रँड हॉटेल” असं नाव दिलं. पुढे चालुन ताज हॉटेलमधे भारताचा पहिला लायसेन्स बार बनवण्यात आला आणि देशातला पहीला डिस्को सुद्धा.
त्याकाळी ताज हॉटेल तेव्हा भारताचे एकमेव असे हॉटेल होते जिथे इलेक्ट्रिसिटी, अमेरीकन पंखे, जर्मन सरकत्या पायऱ्या, तुर्किश बाथरुम सारख्या अदभुत सुविधा होत्या.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर देखील हल्ला केला होता. त्यावेळी ताज हॉटेलचं नुकसान करायचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्याचे काही नुकसान देखील झाले होते, पण त्यानंतर टाटा ग्रुप कडून पुन्हा त्याची दुरुस्ती करण्यात आली.
आतंकवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे आजी राष्ट्रपती बाराक ओबामा भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी याच ताज हॉटेल मध्ये आपला निवास केला होता.
जमशेदजी टाटा यांनी एका अपमानाचा बदला म्हणून सुरु केलेल्या हॉटेलचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला !
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम