तेव्हापासून अशोक सराफ यांना सर्वजण “अशोक मामा” म्हणू लागले
महाराष्ट्रात अशोक सराफ यांचे पिक्चर पहिले नाही, असा माणूस शोधून देखील सापडणार नाही. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत अशोक मामा यांनी आपल्या तगड्या अभिनयाच्या जोरावर मराठी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली.
अशोक मामांनी शेकडो मराठी आणि हिंदी पिक्चर सोबत नाटक आणि हिंदी मालिकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण यामध्ये महत्वाचे म्हणजे सगळ्या चित्रपटविश्वामध्ये वावर असणाऱ्या अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये सारेच जण ‘मामा’म्हणतात. त्यामुळे अनेक प्रेक्षक देखील त्यांना अशोक मामा याच नावाने ओळखतात.
पण त्यांना ‘मामा’ का म्हणतात ? हे फार कमी लोकांना माहित आहे.
अशोक मामांचे मुळ बेळगावचे पण मामांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांचे बालपण देखील मुंबई मध्येच गेले. अशोक मामांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. नंतरच्या काळात त्यांनी संगीत नाटकांमधून देखील भूमिका केल्या होत्या.
“नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास करत असतांनाच त्यांना ‘मामा’ हे नाव पडलं. त्याचं हे नाव पडण्यामागेदेखील रंजक किस्सा आहे.
त्यांच्या मामा बनण्याचा हा किस्सा अशोक सराफ यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. तो असा, एका चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता. तो अनेक वेळा सेटवर त्याच्या मुलीला घेऊन येत असते. त्यावेळी मला पाहिल्यानंतर त्याची मुलगी कायम माझ्याकडे बोट दाखवत हे कोण ? असं विचारायची.
त्यावेळी कॅमेरामन प्रकाशने तिला हे अशोक मामा आहेत आणि त्यांना तू “अशोक मामा” म्हणत जा असं सांगितलं. तेव्हापासून ती मुलगी अशोक सराफ यांना मामा म्हणून हाक मारू लागली. पण नंतर तिच्यामुळे सेटवरील प्रत्येक जण मला हळूहळू मामा म्हणू लागले आणि मला मामा हे नवीन नाव मिळालं. अस स्वतः अशोक सराफ यांनीच सांगितले आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम