कॉंग्रेसला हाताचा पंजा मिळाला, त्यामागे एक गोंधळ झाला होता
1951-52 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली पहिली लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘दोन बैलजोडी’ असे होते.
सध्या आपल्याकडे एकच चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे शिवसेना पक्ष, त्याच नाव आणि त्याच निवडणूक चिन्ह. शिवसेनेच्या कोणत्या गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळणार, हे येत्या काही दिवसात कळेल पण सध्या अस्तित्वात असलेल्या पक्षांना मिळालेल्या चिन्हामागे देखील खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्यातलाच हा काँगेसच्या चिन्हाचा हा किस्सा.
सध्या हाताचा पंजा हे कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह आहे. पण हे काही पहिल्यांदाच काँग्रेसला मिळालेल्या चिन्ह नाही. याआधीही हाताचा पंजा हे चिन्ह अस्तित्वात होतेच. 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हाताचा पंजा चिन्ह हे एका राष्ट्रीय पक्षाला मिळाले होते. हे वाचून आश्चर्य वाटेल
इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे या पक्षाचं अधिकृत नाव. पण, सुरुवातीपासूनच लोकांमध्ये काँग्रेस हेच नाव अधिक रुजलेलं. काँग्रेस ही सामायिक ओळख असली तरी हा पक्ष 1885मध्ये त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत अनेक गटांमध्ये विभागला गेला आहे. आणि अनेक वेळा फुटला आहे.
1951-52 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली पहिली लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘दोन बैलजोडी’ असे होते.
त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर हा पक्ष दोन भागात विभागला गेला. एक काँग्रेस ‘ओ’ आणि दुसरा काँग्रेस ‘आर’. त्याचवेळी दोन्ही पक्षांनी आपापल्या ‘बैलजोडी’ या निवडणूक चिन्हावर दावा करण्यास सुरुवात केली आणि हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचल्यावर काँग्रेस ‘ओ’ला ‘दोन बैलजोडी’ हे चिन्ह देण्यात आले.
इंदिरा गांधी आणि गाय-वासरू
इंदिरा कॉंग्रेसमधून वेगळ्या झाल्या. ‘कॉंग्रेस आय’ म्हणजे इंदिरा कॉंग्रेसची त्यांनी स्थापना केली. जुन्या कॉंग्रेसकडे दोन बैलांवर जु हे चिन्ह स्वतःकडे ठेवलं. इंदिरांना नव राजकीय चिन्ह अपेक्षित होतं. लोकांच्या मनावर हे निवडणूक कोरलेलं होतं. इंदिरांना निवडणूकीत ते चिन्ह मिळणार नव्हतं.
शेवटी इंदिरांना नाईलाजास्तव का होईना नव्या चिन्हाला मान्यता द्यावी लागली.
ते चिन्ह होतं ‘गाई वासराच’
इंदिरांनी या चिन्हावर देशहितकर्ती नेता अशी प्रतिमा उभी केली. काहींनी गाई वासरु या चिन्हाचा उलटा अर्थ काढायला सुरुवात केली. गाई म्हणजे इंदिरा आणि वासरु म्हणजे संजय गांधी असं बोललं गेलं. यानंतर कॉंग्रेसमध्ये पुन्हा फुट पडली. नवीन निवडणूक चिन्ह निवडण्याच सांगण्यात आलं.
1975 मध्ये या खटल्याचा अलाहाबाद कोर्टाचा निर्णय इंदिरा यांच्या विरोधात गेला. कोर्टाने इंदिरा पुढची सहा वर्षं कुठलंही संविधानिक पद भूषवू शकणार नाहीत, असाही निर्वाळा दिला आणि कोर्टाच्या निर्णयानंतर त्या यातल्या कुठेही प्रतिनिधित्व करू शकत नव्हत्या.
त्या सर्वोच्च न्यायालयात लढणार होत्या. लोकांचा वाढता विरोध बघून त्यांनी लोकसभा बरखास्त करून टाकली. देशात आणीबाणी लागू केली. आणीबाणीनंतर झालेली 1977 ची निवडणूक काँग्रेसनं गमावली. इंदिरा गांधीही हरल्या. 1979 मध्ये इंदिरा पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडल्या. इंदिरा काँग्रेस हा स्वतंत्र गट स्थापन केला.
नव्या गटाचं चिन्ह घेतलं हाताचा पंजा.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तत्कालीन सरचिटणीस असलेले बुटा सिंग यांनी निवडणूक आयोगाकडे नवीन चिन्हासाठी याचिका केली होती.
बुटा सिंगसमोर एक सायकल, दुसरा हाताचा पंजा आणि तिसरा हत्ती असे तीन पर्याय ठेवण्यात आले होते.
कोणता पर्याय निवडावा हे बुटा सिंग यांना समजू शकले नाही. बुटा सिंग यांना निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह निवडण्यासाठी बोलावले तेव्हा इंदिरा गांधी पीव्ही नरसिंह राव यांच्यासोबत विजयवाड्यात होत्या.
बुटा सिंग यांनी इंदिरा गांधींना फोन करून त्यांची मान्यता मिळवली. कदाचित टेलिफोनची लाईन स्पष्ट नव्हती किंवा बुटा सिंगचा उच्चार थोडा वेगळा होता, इंदिरा गांधी सतत हाताऐवजी हत्ती ऐकत होत्या.
इंदिरा गांधी तिथून नकार देत होत्या आणि तिथून बुटा सिंग हे समजावण्याचा प्रयत्न करत राहिले की हा हत्ती नव्हे तर हाताचा पंजा आहे, ज्याला ते निवडायला सांगत होते. त्याच वेळी नंतर इंदिरा गांधींनी पीव्ही नरसिंह राव यांना फोन दिला आणि बुटा सिंग काय समजावण्याचा प्रयत्न करत आहेत ते राव यांना समजले नाही. या गोंधळात शेवटी पंजा कॉंग्रेसला मिळाला.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम