लेबनान ची राजधानी ‘बेरूत’ मधील स्फोटामागील कारणे काय ?
- अक्षय पाटणकर
काही दिवसांपूर्वी लेबनानची राजधानी “बेरूत” मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाले आणि या स्फोटात १०० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले, हजारो लोकं जखमी झाले तसेच या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती कि २५० किमी अंतरावर असलेला सायप्रस बेटांवर देखील याचा प्रभाव जाणवला आणि जवळपास अर्धाहून अधिक बेरूत शहर हे बेचिराख झालं, लेबनान हा देश मध्य पूर्व आशियातील एक छोटा देश आहे आणि त्याचा सीमा ह्या इस्राईल,सिरीया या देशांना लागून आहेत,
लेबनान सरकारने स्पष्ट केला की हा स्फोट कुठला प्रकारचा हल्ला नसून अमोनिम नायट्रेट याचा मुळे झाला आहे.
२०१३ साली एक समुद्री मालवाहक जहाज हे जॉर्जिया ते मोझाम्बिक प्रवास करत असतांना काही तांत्रिक अडचणींमुळे लेबनानचा बेरूत येथील ‘बेरूत पोर्ट सिलोस’ ह्या बंदरावर तांत्रिक दुरुस्तीसाठी थांबलं आणि त्यानंतर लेबनान शासनाने या जहाजाची पाहणी करत असतांना त्यांना अमोनिम नायट्रेटचा २७५० टन साठा या जहाजात सापडला.
अमोनिम नायट्रेट हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे हा सामान्यतः फर्टीलायझार म्हणून वापरला जातो. पण यामध्ये जर अल्युमिनियम पदार्थ किवा फ्युल ऑईल अशी पदार्थ संपर्कात आल्यावर मोठ्या प्रमाणात स्फोट होऊ शकतो. म्हणून अत्यंत कठोर मापदंड असतात या पदार्थाच्या साठवणुकीसाठी म्हणून बेरूत बंदर प्रशासनाने याचा शोध घेतला कि या जहाजाचा कोण मालक आहे ? कुठल्या प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसताना असाच हे जहाज पुढे प्रवास करू शकत नाही. पण या जहाजाच्या मालकाने यावर प्रतिक्रिया देत हे आमचा नाही आणि आम्ही याचे मालक नाही बेरूत प्रशासन हे जप्त करून त्यांच्कडे ठेऊ शकत. म्हणून २०१५ साला पासून बेरूत पोर्ट सिलोस या बंदराचा गोदामामध्ये २७५० टन अमोनिम नायट्रेट असच पडून होतं.
पण बेरूत प्रशासनाने सुद्धा हीच चूक केली आणि कुठलेही सुरक्षा मापदंडाच पालन न करतात असच बंदराचा गोदामात पडून राहू दिला आणि हे जे बेरूत पोर्ट सिलोस हे बंदर बेरूत शहराचा अत्यंत मध्यवर्ती आणि रहिवासी भागात येत आणि शेवटी काल तिथं या अमोनिम नायट्रेट मुळे स्फोट झाला.
यानंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्यक्तव्य देऊन खळबळ माजवली, त्यांचा किवां त्यांचा रक्षा तज्ञांचे मते हा मोठा प्रमाणातला बॉम्ब हल्ला आहे आणि यामागे कोणाचातरी हाथ आहे पण बेरूत प्रशासनने यावर साफ नकार देऊन हा अमोनिम नायट्रेट मुळेच झालेला हल्ला आहे असं स्पष्टीकरण दिलेलं आहे.
या आधी सुद्धा जगात अमोनिम नायट्रेट मुळे स्फोट झाले आहेत , २०१३ मध्ये अमेरिकेतील टेक्सास मधे, ओक्लाहामा मध्ये १९९५ साली आणि युरोपातील फ्रान्स मध्ये सुद्धा झाले आहेत.
आधीच लेबनान देश आर्थिक संकटातून जात आहे त्यात कोव्हीड चा वाढता प्रादुर्भाव आणि झालेला भयानक स्फोट या सगळ्यातून लेबनानची पुढची वाटचाल अजून खडतर झाली आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम