बच्चू कडू : हळव्या नेत्याच्या सहवासात
एक म्हण आहे “तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तुम्हाला नातवाच्या पुढे कोणीही लक्षात ठेवणार नाही पण लोकसेवा केलीत तर कितीही पिढ्या जावोत लोक तुम्हाला विसरणार नाहीत”
तसच काहीस बच्चूभाऊ यांनी केलं आहे. त्यांनी राजकारणाचा उपयोग करून जनतेची केलेली सेवा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, अनेक राजकारणी जनसेवा केवळ राजकारणात यशस्वी होण्यासाठी करत असतात पण संत गाडगेबाबाचा वारसा घेऊन आलेला हा बच्चू केवळ सेवा तिही अधिक सक्षमपणे करता यावी यासाठी राजकारण करत आहे, म्हणूनच हा माणूस कुठेही राहतो, काहीही खातो, कधीही याला आमदार -मंत्री झाल्याचा अहंकार चिटकट नाही.
मुंबई मध्ये आम्ही प्रहार चे काम सुरू केले तेव्हा पासून संपूर्ण महाराष्ट्रातून रंजला गंलेला माणूस बच्चूभाऊ ना मनोरा आमदार निवास मध्ये शोधत येताना पाहतोय, भाऊ जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करत, अनेक वेळा आमदार निवासातुन भाऊंचे शर्ट ,पॅन्ट, चप्पल चोरीला गेल्याचे मी पाहिले आहे पण भाऊंनी कधीच कोणालाही रूम मध्ये झोपण्यास मनाई केली नाही.
भाऊ सांगतात आमदार होई पर्यंत अनेक वेळा तिकीट न काढता केलेला रेल्वे प्रवास बरच शिकवून गेला, भारत समजण्यासाठी गांधीजी रेल्वे ने फिरले, बच्चूभाऊ यांचे विना तिकीट रेल्वे प्रवासाचे अनुभव ऐकले की अंगावर काटा येतो. दादरच्या गाडगेबाबा धर्मशाळेत एक दिवस राहणं लोकांच्या जीवावर येत भाऊ 15-15 दिवस या धर्मशाळेत मुक्कामी असत, ते अनुभव सांगताना भाऊ आनंदात असतात.
लोकांच्या दुःखात आनंद निर्माण करण्यासाठी सतत धडपडणाऱ्या बच्चूभाऊ याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
- ऍड.अजय तापकीर
- लेखक बच्चू कडू यांच्यासोबत कार्यरत आहेत.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम