Take a fresh look at your lifestyle.

एकेकाळी लोकं म्हणायचे शिवसेना संपवली ; पण तोच आता महामारीमध्ये ‘महाराष्ट्र’ भक्कमपणे सांभाळतोय

0
  • आकांक्षा चौगुले

27 जुलै 1960 रोजी जन्मलेले उद्धव ठाकरे हे बाळसाहेब ठाकरे यांचा सर्वात लहान चिरंजीव. त्यांच्या माधव ठाकरे आणि जयदेव ठाकरे या दोन मुलापेक्षा उद्धव ठाकरे सर्वात शांत व संयमी होते.

उद्धव ठाकरे यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील बालमोहन विद्यामंदिरातून केले. नंतर त्याचे चुलत भाऊ राज ठाकरेही या शाळेत दाखल झाले. बालमोहन विद्यामंदिरातून शिक्षण घेतल्यानंतर उद्धव ठाकरे जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी पुढील शिक्षण घेतले.

लहानपणापासून उद्धव ठाकरे यांचा कला, विशेषत: फोटोग्राफीकडे त्यांचा कल होता. त्यांनी ‘पहावा विठ्ठल’ व ‘महाराष्ट्र देशा’ अशी दोन फोटोग्राफीची पुस्तकही प्रकाशित केली आहेत.

एक छायाचित्रकार नेता कसा बनला ?

उद्धव ठाकरेंना राजकारणात येण्याचा कोणताही रस नव्हता. पण 1994 नंतर उद्धव ठाकरे यांची एन्ट्री हळूहळू होऊ लागली. आई मीनाताईंची तशी इच्छा होती. मीनाताईनां वाटतं होत तीन मुलांपैकी एकातरी मुलांने राजकारणात सक्रिय व्हायला पाहिजे. त्यामुळे राजकारणात रस नसतानाही उद्धव यांना राजकारणात यावे लागले. वयाच्या 34 वर्षी राजकारणाते सक्रिय झाले.

ते जसे अपघाताने राजकारणात आले तसेच ते अपघाताने राज्याचे मुख्यमंत्री ही झाले.

बाळासाहेबांच्या पश्चात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परंपरेने शिवसेनाप्रमुख पद चालून आले. त्यावेळी काही लोकांना असे वाटले की वंशवादामुळे राज ठाकरेंवर अन्याय झाला आहे, असे वाटले होते. पण त्याचवेळी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या फक्त 45 जागा निवडून आल्या, त्यावेळी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याच काळात उद्धव ठाकरें शिवसेना संपवतील असं बोललं जातं होत.

2012 मध्ये बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेची सगळी जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर आली.

याच कालावधीत देशभरात मोदी, मोदींचा नारा देशात गुंजू लागला. 2014 च्या निवडणुकीत केंद्रामध्ये मजबूत सत्ता आणि बऱ्याच वर्षानंतर मोदींच्या भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा यामध्ये अभूतपूर्व असे यश मिळाले. नंतर वेळोवेळी शिवसेना सत्तेत राहून सुद्धा आक्रमक राहिली. नंतर युती तुटली आणि राज्याच्या राजकारणात अनपेक्षित असा महाविकास आघाडीचा प्रयोग केला. तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात आले.

पण जर आपण शिवसेनेच्या मागील पाच ते सहा वर्षाचा काळ पहिला तर आपल्याला लक्षात यईल की आदरणीय बाळासाहेब गेल्या नंतरचा सेनेचा प्रवास पाहता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व्यवस्थित पद्धतीने हाताळली आहे. एखाद्या पक्षाचा मोठा नेता गेल्यानंतर त्या पक्षाचा संपूर्ण डोलारा कोसळल्याचे अनेक उदाहरणे आहेत. पण बाळासाहेब गेल्या नंतर उद्धव ठाकरेनी शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांना योग्य प्रकारे सांभाळून भारतीय जनता पक्षासारखा शतप्रतिशत राजकीय खेळी करणाऱ्या पक्षाला बाजूला सारून आणि वेगळ्या विचारधारेच्या पक्षासोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी स्वतःहा राजकीय चाणक्य असल्याची चुणूक दाखवून दिली आणि शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद खेचून आणले.

यावरून उद्धव ठाकरेंकडे संघटन कौशल्य आहे हेच अधोरेखित होत आहे. अश्याच संयमी आणि योग्य वेळी योग्य निर्णयक्षमता असलेले नेतृत्वगुण उद्धव ठाकरे यांच्याकडे आधीपासून वंशपरंपरेने आहे. त्याचाच आधार घेऊन आणि त्यातून आपले व्यक्तिमत्त्व घडवून उध्दव ठाकरे यांनी इथपर्यंतचा प्रवास केला आहे. उद्धव ठाकरे यांना प्रशासनातील कसलाही अनुभव नसताना कोरोनाच्या संकटात केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. आधीची केलेली कर्जमाफी, केंद्र सरकारकडे जीएसटीचे कोट्यवधी रुपये अडकणे यामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. केंद्रात सतेत असलेल्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष सहकार्य करण्याऐवजी फक्त टीका करत आहेत.

राष्ट्रवादी सारख्या मुरब्बी आणि काँग्रेस सारख्या विरुद्ध विचारसरणीच्या पक्षांसोबत काम करताना जो संयम पाहिजे तो उध्दव ठाकरेंच्याकडे आहे.

प्रशासनाचा शून्य अनुभव असणारा हा नेता वैचारिक विरोधंका बरोबर सत्ता कशी चालवू शकेल या बाबत अनेकांच्या मनात शंका होती. परंतु केवळ सहा महिन्याच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यात विलक्षण बदल बघायला मिळाला आहे हेही तितकेच सत्य आहे.

या संकटामध्ये राज्यकर्त्यांनी संकटाची एकूण जाणीव, लढण्यास बळ देन महत्त्वाचं असत आणि तेच उद्धव ठाकरे यांच्या विविध पत्रकार परिषद , फेसबुक लाईव्ह यामाध्यमातून दिसून येत आहे. एक नेता नाही तर कुटुंबप्रमुख काळजी घेत आहे असं कायम जाणवत राहतंय.

शांत,संयम असणारा हा चेहरा आता या संकटा विरुद्ध लढणाऱ्या पोलीस, डॉक्टर,नर्स, सफाई कर्मचारी,पेंशट या सर्वांना बळ देऊन जातो आहे हे नक्की !!

टिव्ही वरून जनतेला संदेश देतांना देखील वस्तुस्थिती आणि सत्य जनते समोर मांडतात आणि लॉकडाऊनला सहकार्य करा अशी विनंती करतात.राज्याचा मुख्यमंत्री नव्हे तर आपल्या घरातीलच व्यक्ति आपल्याला संबोधन करते आहे, अशी विनम्र विनवणी करणारा पहिलाच ‘मुख्यमंत्री’ असावा.

  • आकांक्षा ज्ञानराज चौगले
    लेखिका शिवसेना आमदार ज्ञानराज चौगले यांच्या कन्या आहेत

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.