मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या रखमाबाई देशातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या
सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आंनदीबाई जोशी, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आज आपण या समाजसुधारकांच्या काळातील अश्या एका व्यक्तीबद्दल आपण जाणून घ्यायला पाहिजे. जी कधी प्रकाशझोतात आली नाही. ती व्यक्ती म्हणजे डॉ. रखमाबाई राऊत !
आता या रखमाबाई कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, 1 जुलै 2018 ला डुडलच्या माध्यमातून रखमाबाई प्रकाशझोतात आल्या.
1864 साली रखमाबाई त्यांचा जन्म मुंबई इथे झाला. वयाच्या 11व्या वर्षीचं त्यांचं लग्न त्यांच्या विधवा आईने लावून दिलं. मात्र, आपल्या पतीकडे जाण्यासाठी रखमाबाईंनी साफ नकार दिला आणि इथूनच सुरू झाला त्यांचा समाज सुधारणेचा बंड .!
काळ हळूहळू पुढे सरकला, आता रखमाबाईंच्या विधवा आईंनी लग्न सावत्र वडिलांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता.
“त्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन हे शल्यविषारद होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी.”
“तसं पाहिलं तर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं अल्प काळात निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या.”
बालविवाहाविरुद्ध लढा
रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली होती. आपल्या बालपणी झालेलं लग्न रखमाबाईंना मान्य नव्हते आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला.
जस्टिस रॉबर्ट हिल पिंगहे या न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या बाजूनं निकाल दिला. हा खटला 1884 ते 1887 पर्यंत चालला. यावेळी, समाजकंटकांकडून रखमाबाईवर अनेक टीका टिपणी पण करण्यात आल्या मात्र, रमाबाईंनी यावर कधीच लक्ष केंद्रित केले नाही.
पुढे चालून हेच बालविवाह विरोध एक महत्त्वाचं पाऊल ठरले.
पुढे, एमडीचे शिक्षण घेतांना ही “इंग्लंडच्या कॉलेजनं त्यांना एमडी करण्याची परवानगी दिली नाही. कारण त्याकाळी इंग्लंडमध्येही स्त्रियांना एमडी करण्याची परवानगी नव्हती. त्याकरिता त्यांनी तिथंही लढा दिला. शेवटी त्यांनी ब्रसेल्सला जाऊन पोस्ट ग्रॅज्युअशन पूर्ण केलं व एमडी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर झाल्या.”
आपली वाचन – लिखाणाची आवड जोपासत रखमाबाईंनी ‘द हिंदू लेडी’ या टोपणनावानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखही लिहीले होते. पण, रखमाबाईंनी याबाबत कधीही जाहीर वाच्यता केली नाही. मात्र, अवघड परिस्थितीत ही मात करून आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या रखमाबाई काही औरच व्यक्तिमत्त्व आहेत.
- कल्याणी नागोरे
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम