कर्नाटकचे मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान झाले !
१९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या अध्यक्षतेखालील कॉंग्रेस पक्ष निर्णायकपणे पराभूत झाला परंतु सरकार स्थापण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाने पुरेश्या जागा जिंकल्या नव्हत्या. तेव्हा युनायटेड फ्रंटने कॉंग्रेसच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणी गौडा सरकारचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि भारताचे अकरावे पंतप्रधान झाले. १ जून १९९६ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.
सामाजिक आर्थिक विकास व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे कट्टर समर्थक असलेल्या श्री. एच. डी. देवेगौडा यांचा जन्म 18मे 1933 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनारासिपुरा तालुक्यात असलेल्या हरदनहल्ली गावात झाला.
सिविल इंजिनीरिंग पदविका धारक श्री. देवेगौडा यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. 1953 साली त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला व 1962 पर्यंत ते या पक्षाचे सदस्य राहिले.मार्च 1972 पासून मार्च 1976 पर्यंत व नोव्हेंबर 1976 पासून डिसेंबर 1977 पर्यंत विधानसभेत ते विरोधी पक्ष नेते म्हणून प्रख्यात होते.
श्री. देवेगौडा यांनी 22 नोव्हेंबर 1982रोजी विधान सभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सातव्या व आठव्या विधानसभेचे सदस्य असताना त्यांनी सार्वजनिक बांधकाम व सिंचन मंत्री म्हणून काम पाहिले. सिंचन मंत्री असताना त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प सुरु केले. 1987 मध्ये त्यांनी सिंचन क्षेत्रासाठी दिल्या गेलेल्या अपुऱ्या निधीचा विरोध करून मंत्रीपदाचा राजीनामा दिला.1989 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये जनता दलाला 222 मधील केवळ 2 जागांवर यश मिळाले हा पक्षाचा कडवा पराभव होता. श्री. गौडा यांच्यासाठी ही कारकीर्दीतील पहिलीच मोठी हार होती, त्यांनी लढवलेल्या दोन्ही जागांवर त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
जानेवारी 1995 मध्ये श्री. गौडा स्वित्झर्लंड दौऱ्यावर गेले असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञांच्या परिषदेत सहभाग घेतला होता. युरोपीय तसेच मध्य पूर्व देशांमधील त्यांचे दौरे ते एक समर्पित राजनेते असल्याचे दाखले देतात. श्री. गौडा यांनी आपल्या सिंगापूरच्या दौऱ्या दरम्यान राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक परकीय गुंतवणूक राज्यात आणली ह्यावरून त्यांच्या व्यावसायिक चाणाक्ष बुद्धीचा प्रत्यय येतो.गौडा हे दोन वेळा जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते.
रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री असताना त्यांनी १९८३ ते १९८८ पर्यंत कर्नाटकातील जनता पार्टी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. १९९४ मध्ये ते जनता दलाच्या प्रदेश अध्यक्ष झाले आणि १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयामागील प्रेरणास्थान होते. डिसेंबरमध्ये कर्नाटकच्या १४व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा ते रामनगरातून निवडून आले होते.
श्री. देवेगौडा यांना आपल्या कौटुंबिक शेतकरी पार्श्वभूमीचा अभिमान वाटतो. देवगौडांना अचानकपणे तिसऱ्या आघाडीचे(प्रादेशिक पक्ष व बिगर काँगेस व बिगर भाजप युती) नेतृत्व करण्याची संधी मिळाली ज्यामुळे ते पंतप्रधान पदापर्यंत जाऊ शकले. 30 मे 1996 रोजी देवेगौडा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भारताचे 11 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम