Take a fresh look at your lifestyle.

मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

0

आज लॉकडाऊन मुळे सगळेच जण घरात आहेत. अशावेळी घरात बसून काय करताय ? अस कोणाला विचारलं तर एक उत्तर नक्की येईल “फेसबुक स्क्रोलींग” आजघडीला फेसबुक हे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनल आहे. हे मात्र कोणाला नाकारता येणार नाही.

२००२ साली एक वेबसाईट असलेले फेसबुक आज जगातील मोठी कंपनी बनली आहे आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

आज १४ मे मार्क झुकेरबर्ग याचा वाढदिवस त्यानिमित्ताने मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

लहानपण

मार्क झुकेरबर्गचा जन्म १४ मे १९८४ ला न्यूयॉर्कमधे एका उच्चशिक्षित कुटुंबात झाला. त्याचे वडील डेंटिस्ट, तर आई मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्याला ३ भावंडं आहेत. लहानपणापासून मार्कला कम्प्यूटर आणि प्रोग्रॅमिंगमधे इंटरेस्ट निर्माण झाला. मार्क १२ – १३ वर्षाचा असताना त्याने झुकेनेट म्हणून एक मेसेजिंग प्रोग्रॅम डेवलप केला होता. ज्याचा वापर त्याच्या बाबांनी त्यांच्या डेंटल क्लिनिकमधे केला. त्यामुळे त्याचे वडील क्लिनिकमधे इंटीग्रेशन टेक्नॉलॉजी वापरणारे पहिले डॉक्टर ठरले.

यावरून अंदाज लावता येईल कि मार्क झुकेरबर्गला कम्प्युटरमध्ये किती इंटरेस्ट होता. मार्क ग्रॅज्यूएशन करत असताना त्याने अनेक शाळांसाठी सॉफ्टवेअर डेवलप केले. त्यावेळी त्याच एक सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट कंपनीनेही विकत घेतलं होतं.

हावर्ड युनिवर्सिटी आणि फेसबुक

२००२ साली मार्क झुकेरबर्गने हावर्ड युनिवर्सिटीत प्रवेश घेतला. हावर्ड युनिवर्सिटी मध्येही त्याने कोर्समॅच नावाचं विद्यार्थांना त्यांच्या कोर्सनुसार क्लास शोधण्यात मदत करणारं सॉफ्टवेअर बनवलं. मग त्याने फेसमॅश नावाचं सॉफ्टवेअर बनवलं. ज्यात कॅम्पसमधले विद्यार्थी विद्यापीठातील निर्णयांसाठी वोट करू शकत होते. मात्र कालांतराने विद्यापीठाच्या प्रशासनाने ते बंद केलं.

पुढे एडुआर्दो सँवेरीन, क्रिस ह्युजेस व डस्टीन मॉस्कोविटज या मित्रांसोबत मार्कने द फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट सुरु केली.

कॉलेजला राम राम !

२००४ साली फेसबुक अधिकृतरित्या सुरु झालं आणि त्यानंतर काही काळातच मार्क झुकेरबर्गने आपल्या शिक्षणाला राम राम ठोकला आणि पूर्ण वेळ फेसबुक वर काम करायला सुरुवात केली. एका माहितीनुसार २००४ च्या शेवटी फेसबुकचे १ लाख युजर्स होते.

त्यानंतर फेसबुकने काही कंपन्यासोबत भागीदारी केली आणि त्यामुळे २००५ मधे फेसबुकला बुस्ट मिळालं. २००५ वर्षाच्या शेवटी ५० लाख युजर्स झाले. त्याने साईटवर नवे काही फिचर्स चालू केले. पुढे याचं नाव फेसबुक झालं. ही साईट जगभरात सुरु झाली. मार्क झुकेरबर्गने पुढे मार्केटींग करून अनेक तरुणांना फेसबुककडे वळवलं. मग यात वेगवेगळ्या अशा ४० हून अधिक भाषांचा समावेश झाला. ग्रुप, पेज, गेम इत्यादी गोष्टी हळू हळू येऊ लागल्या.

२०१२ मधे फेसबुकमधे मेजर बदल झाले. फेसबुक ही कंपनी शेअर बाजारात आली.

सध्या फेसबुक

सध्या मार्क झुकेरबर्गचं वार्षिक उत्पन्न ७ हजार कोटी युएस डॉलर इतकं आहे. फेसबुक कंपनी २०१८ मधला रेवेन्यु ५ अब्ज एवढा होता. जगभरात फेसबुक रोज वापरणारे १ अब्ज युजर्स आहेत. सध्या फेसबुककडे वॉटसएप, इंस्टाग्राम, फ्रेंड्सफिड सारख्या आणखी काही सोशल नेटवर्किंग साईटसची मालकी आहे. मार्क २००९ मधे जगातला सर्वात तरुण कोट्यधीश बनला. टाईम आणि फोर्ब्स मॅगझिनच्या जगातील सर्वात शक्तीशाली, श्रीमंत आणि लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या लोकांच्या यादी मार्कचा समावेश झालाय.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.