‘कोरोना’मुळे चीन आर्थिक संकटात, भारताला संधी !
कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा फटका बसला आहे. कारण पुरवठासाखळी विस्कळित झाली आहे. त्यातून निर्माण झालेली पोकळी व्यापण्याची सुवर्णसंधी भारताला चालून आली आहे.
अमेरिकेसह अनेक देश चीनला पर्याय म्हणून भारताकडे पहात आहेत. भारतात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता मुबलक आहे. पण आजवर आपण मागणीच्या शोधात होतो. आज चीन बॅकफूटवर गेल्यामुळे भारताला निर्यात वाढवण्यास मोठा वाव आहे. याचा फायदा घेण्यासाठी शीघ्रगतीने उपाययोजनांची व पावले टाकण्याची गरज आहे.
परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम