Take a fresh look at your lifestyle.

मोबाईल रिपेअर करणाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना हरवलं

0

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. पाचपैकी चार राज्यात भाजप बहुमताच्या दिशेने आहे, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे पहिल्यांदाच सरकार बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आप कडून भगवंत मान यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी याआधीच घोषणा झालेली आहे.

दरम्यान, आजचा विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

पंजाब विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले असून आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यायचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं जल्लोष सुरू केला असून नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षाचा पराभव मान्य देखील केला आहे.

या पार्श्वभूमीवर पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील पराभूत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

मात्र, त्यांना कुणी पराभूत केलं, यासंदर्भात आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी खुलासा केला आणि त्या उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

त्या उमेदवाराचं नाव आहे लाभसिंग उगोके!

पंबाजचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी दोन जागांवर निवडणूक लढवत होते, पण दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. याबद्दल बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की,

‘आपल्या पक्षाची ताकद काय आहे, हे चन्नींच्या पराभवावरुनच समजली. चन्नींचा पराभव कुणी मोठ्या नेत्याने नाही, तर एका मोबाईल रिपेअर करणाऱ्या सामान्य व्यक्तीने केला.’

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी चमकौर साहिब आणि आपचा बालेकिल्ला भदौर येथून निवडणूक लढवली होती. भाजपने दर्शनसिंह शिवजोत यांना तर ‘आप’ने डॉ.चरणजीत सिंह यांना तिकीट दिले होते. चमकौर साहिबमधून बसपचे हरमोहन सिंग निवडणुकीच्या रिंगणात होते. भदौरमधून पंजाब लोककाँग्रेसने धरमसिंग फौजी, आपने लाभसिंग उगोके, तर सतनाम सिंग यांनी अकाली तिकिटावर निवडणूक लढवली.

कोण आहेत लाभसिंग उगोके?

‘पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव करणारे लाभसिंग उगोके हे एका मोबाईल फोन दुरुस्तीच्या दुकानात काम करतात, त्यांच्या आई सरकारी शाळेत सफाई कामगार आणि वडील शेतमजूर आहेत.  तसेच, काँग्रेसचे दिग्गज नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा पराभव करणाऱ्या महिला उमेदवार जीवन ज्योती कौर यादेखील एका कुटुंबातील आहेत, अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.