Take a fresh look at your lifestyle.

वयाच्या ९२ व्या वर्षी कोरोनाच्या काळात देखील एनडी पाटीलांनी वीजबीलाविरोधात आंदोलन केलं होत

लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.

0

महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं.

15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केलं होतं.

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत मजल मारली. तब्बल १८ वर्षे ते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य होते.

लोकशाही आघाडी सरकारचे ते निमंत्रक होते

१९७८ ते १९८० या काळात त्यांनी राज्याचे सहकार मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. राज्य विधानसभेत त्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले होते. राज्यात १९९९ साली आलेल्या लोकशाही आघाडी सरकारचे ते निमंत्रक होते. विधिमंडळाचे सदस्य म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडिकीने मांडले. लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे.

लोकांसाठी झालेल्या अनेक लढ्यांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला

सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी एन. डी. पाटील यांना प्रचंड आस्था होती. त्या चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. सीमा भागातील मराठी भाषिकांना त्यांना मोठा आधार वाटे. एन. डी. पाटील देखील सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात सातत्यानं आवाज उठवत. त्याशिवाय, लोकांसाठी झालेल्या अनेक लढ्यांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

एन डी पाटील महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते तेव्हाची गोष्ट. एका सकाळी त्यांच्याकडे एक माणूस भेटायला आला. बंगल्यावर कोणीही कर्मचारी नव्हता. तो माणूस सरळ आत गेला. बैठकीच्या खोलीत बसला.बराच वेळ कोणी बाहेर येईना म्हटल्यावर तो ज्या दिशेने कपडे धुण्याचा आवाज ऐकू येत होता तिकडे चौकशी करायला गेला. तेव्हा एन डी पाटील त्याला तिथे कपडे धूत बसलेले दिसले.

महाराष्ट्राचे सहकारमंत्री कपडे धूत आहेत हे त्याच्यासाठी धक्कादायक होतं.

त्या माणसाची चाहूल लागल्यावर त्यांनी वळून बघितलं आणि म्हणाले,”तुम्ही माझ्याकडे आलाय का? जरा थांबा. आलोच मी. आज सुट्टी होती म्हणून कपडे धूत होतो.” तो माणूस ते दृश्य पाहून बघतच राहिला.

कारण महाराष्ट्राचे सहकारमंत्री कपडे धूत आहेत हे त्याच्यासाठी धक्कादायक होतं. शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्याबाबतीतला हा एक प्रसंग सांगतात. असे अनेक प्रसंग सांगता येतील. त्यांचे कार्यकर्ते असे घडलेले अनेक प्रसंग सांगतात.

काही दिवसांपूर्वी एन डी पाटील यांनी कोल्हापूरात एक आंदोलन केलं.

कोरोनाच्या काळातील घरगुती वीज बिलाची होळी करणारं हे आंदोलन.

वयाची नव्वदी ओलांडली आहे. दोन्ही पायांना त्रास आहे. चालता येत नाही.पायांना अपघातात इजा झालीय. चालता येत नाही म्हणून घरात बसणारा हा नेता नाही. लढणं माहिती आहे. सरकार कोणाचेही असो.

सरकारी धोरणं श्रमिकांच्या हिताच्या विरोधात निघाली की एन डी पाटील रस्त्यावर आलेच. लढेंगे जितेंगे ही त्यांची आवडती घोषणा. ती त्यांच्याच बुलंद आवाजात ऐकायला पाहिजे. आंदोलन बघत उभा असलेल्या बघ्या माणसालाही त्या आंदोलनात सहभागी व्हावं असच वाटते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.