Take a fresh look at your lifestyle.

खुद्द रतन टाटा यांनीच फोन करुन विचारल, तू माझ्याबरोबर काम करणार का ? व्हायरल होणाऱ्या ‘शंतनू नायडू’ची कहाणी

0

भारताचे ‘रतन’ टाटा यांना नुकतंच वयाच्या 84 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अत्यंत साधेपणाने त्यांनी वाढदिवस साजरा केला.

त्यांनी छोट्या कप केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून आपला वाढदिवस आनंदात साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधेपणाने साजरा केलेल्या वाढदिवसावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पण या व्हिडीओ मधील तरुण युवकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

विशेष म्हणजे हा रतन टाटा यांचा कोणी नातेवाईक नाहीय, असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्य वाटेल. पण मग हा तरुण आहे तरी कोण त्याच्यासोबत रतन टाटांनी वाढदिवस साजरा केला, असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. या तरुणाचं रतन टाटांसोबत खास कनेक्शन आहे. याच कनेक्शनबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊयात.

व्हिडीओमध्ये नक्की आहे तरी काय

उद्योपती रतन टाटा यांनी नुकताच त्यांचा 84 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडीओ टाटा मोटर्स फायनान्सचे व्यवसाय व्यवस्थापक वैभव भोईर यांनी सोशल मीडियावर शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nation Mic (@nationmic)

या व्हिडीओमध्ये रतन टाटा निळ्या रंगाच्या शर्टमध्ये स्मितहास्य देताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये रतन टाटा एका खुर्चीवर बसले असून ते समोरच्या टेबलवरील छोटा कप केक कापताना दिसत आहेत.

छोट्या केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून नंतर रतन टाटा हा केक कापतात. त्यानंतर समोरच्या टेबलजवळ बसलेला तरुण रतन टाटांच्या बाजूला येऊन उभा रातो आणि त्यांच्या खांद्यावरुन मायेनं हात ठेवतो. नंतर तो खाली बसतो आणि कापलेल्या कप केकचा एक तुकडा रतन टाटांना भरवतो.

त्यांच्या सोबत 28 वर्षांचा एक तडफदार तरुण पाहायला मिळत आहे त्या तरुणाचीच चर्चा सध्या सोशल मीडिया वर आहे की हा तरुण कोण ? तर हा तरुण म्हणजे उद्योगपती शंतनू नायडू.

नायडूंनी टाटांसाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या बॉससाठी वाढदिवसाचे गाणे गायले, त्यांच्या खांद्यावर थोपटलेसुद्धा. तो आपल्या युनिक आयडियांसाठी प्रसिद्ध आहेत. शंतनू नायडू. शंतनू हा रतन टाटांचा पर्सनल सेक्रेटरी आहे. तसे रतन टाटा हे तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणे, किस्से सोशल नेटवर्किंगवर कायम व्हायरल होत असतात.

कोण आहे शंतनू नायडू ?

28 वर्षीय शंतनू नायडू यांची मोटोपॉज नावाची कंपनी असून ही कंपनी डॉग कॉलर बनवते.

अनेकदा कुत्रे वाहनाखाली येऊन मरतात ही गोष्ट शंतनू नायडू यांच्या लक्षात आली यानंतर शंतनूला रिफ्लेक्टर कॉलर बनवण्याची कल्पना सुचली. या कॉलरच्या साहाय्याने रस्त्यावरील दिवे नसतानाही वाहनचालक कुत्रे दुरून पाहू शकतात. टाटांच्या प्राणी प्रेमाबद्द्ल आपल्या सर्वांनाच माहित आहे. ही गोष्ट जेव्हा रतन टाटांना कळाली तेव्हा त्यांनी शंतनू नायडूचे कौतुक केले.

स्टार्टअप्स मध्ये गुंतवण्यात शंतनू नायडू चा विचार असतो

शंतनूने वडिलांच्या सांगण्यावरून रतन टाटा यांना पत्र लिहिले आणि या कल्पने बद्दल सांगितले आणि त्याला उत्तर म्हणून रतन टाटा यांना भेटण्याचे आमंत्रण मिळाले. सध्या रतन टाटा ज्या स्टार्टअप्समध्ये त्यांची वैयक्तिक गुंतवणूक करतात त्या स्टार्टअप्समागे 28 वर्षीय शंतनू नायडू यांचा विचार असतो.

या तरुणाला खुद्द रतन टाटा यांनीच फोन करुन, “तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा केली होती. हो तुम्हाला हे खरं वाटणार नाही पण खरोखरच टाटांनी शंतनू नायडू या तरुणाला फोन करुन स्वत: कामाची ऑफर दिली. यासंदर्भातील शंतनूचा प्रवास सांगणारी एक पोस्ट काही वर्षापूर्वी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ने शेअर केली होती.

टाटांना दिलेलं आश्वासन

रतन टाटा यांच्याशी ओळख झाल्यानंतर अचानक शंतनूने नोकरी सोडून परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी त्याने रतन टाटांना एक आश्वासन दिलं.

याबद्दल बोलताना शंतनू म्हणाला होता , “मी शिक्षणासाठी परदेशात गेलो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य टाटा ट्रस्टमध्ये काम करण्यासाठी देईन असं आश्वासन मी रतन टाटांना दिलं. त्यांनी मला हसत हसत होकार दिला,” अशी आठवण त्याने सांगितलेली आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.