मुंबईमधील या पाच दहीहंड्या ज्याची चर्चा राज्यभर होते
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो.
दहीहंडीच्या वेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात. आजमितीला प्रत्येक विभागातून विविध मंडळे या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी( छोट्या आकाराचे मडके) लावले जाते. ही हंडी तरुणांची विविध मंडळे फोडण्याचा प्रयत्न करतात.
हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्यात बक्षिसही दिले जाते. दहीहंडी दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात साजरी केली जाते.पण गेल्या २ वर्षात कोरोना मुले मात्र हा सॅन मोठ्या प्रमाणात साजरा होऊ शकलेला नाही.
महाराष्ट्रातच दहीहंडीचा उत्साह सर्वाधिक पाहायला मिळतो. पुणे, मुंबई(जुहू) या ठिकाणी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी होणाऱ्या तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. तरुणांची अनेक मंडळे एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी ‘गोविंदा आला रे’ च्या घोषणांनी आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो.
संकल्प प्रतिष्ठान , वरळी
संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर आयोजित करतात. वरळीच्या जी.एम. भोसले मार्गाच्या जांभोरी मैदानावर ही दहीहंडी बांधण्यात येते. या दहीहंडीला बॉलीवुडचे दिग्गज कलाकार उपस्थित राहत असल्याने ही दहीहंडी खूप प्रसिद्ध आहे. तसेच ही दहीहंडी मुंबईमधील सर्वात उंच असलेल्या दहीहंड्यांपैकी एक आहे.
आनंद चॅरीटेबल ट्रस्ट, ठाणे
ठाण्यामधील आनंद चॅरीटेबल ट्रस्टची दहीहंडी ही देखील एक प्रसिद्ध दहीहंडी आहे. आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्या दहीहंडीचे आयोजन शिवसेनेचे खासदार राजन विचारे करतात. ही दहीहंडी ठाण्यामधील जांभळी नाका येथे आयोजित करण्यात येते. दहीहंडीच्या सणाला आता खूप मोहक रूप प्राप्त झाले आहे, तरीसुद्धा या ठिकाणी असलेले लोक मोठ्या निष्ठेने आणि प्रेमभावनेने या हंडीचे आयोजन करतात.
रानडे रोड, दादर
दादरच्या रानडे रोडवरची दहीहंडी ही मुंबईतील प्रसिद्ध दहीहंड्यांपैकी एक दहीहंडी आहे. या दहीहंडीचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते. येथे जेव्हा संपूर्ण मुंबईभरातून येणाऱ्या बाळगोपाळांची छोटी पथके थर लावायची कसरत करतात तेव्हा त्यांची ती मेहनत पाहून अगदी स्तब्ध व्हायला होते.
संकल्प प्रतिष्ठान, ठाणे
ईशान्य मुंबई काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात येणारी ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी देखील अतिशय प्रसिद्ध आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये निरनिराळ्या लोककलांचे कार्यक्रम सादर केले जातात. ठाण्याच्या रघुनाथ नगरमध्ये ही दहीहंडी बांधण्यात येते. या दहीहंडीला मुंबई आणि ठाण्यामधील खूप मंडळे उपस्थिती लावतात.
वांद्रे कॉलनी दहीहंडी
भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आणि मुंबई युवामोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांच्या सहकार्याने या दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. मुंबईमधील सर्वात लक्षवेधी दहीहंडी म्हणून या दहीहंडीचा नावलौकिक आहे.
मुंबईतील सर्वच मोठ्या मंडळांना आयोजकांतर्फे येथे येण्यासाठी खास आमंत्रण असते म्हणे! तसेच मुंबईच्या जवळ पडत असल्याने येथे बघ्यांची आणि बालगोपाळांची मोठी गर्दी असते.
सरकारने दहीहंडी साठी केले नियम
अनेकदा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणारे तरुण थरावरून कोसळून जखमी होतात. यात फोडणाऱ्याच्या जीवावरही बेतू शकते. २०१२ साली जवळजवळ २२५ गोविंदा जखमी झाले होते. यासाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम तयार केले आहेत.
१) २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने १२ वर्षाखालील मुलांनी दहीहंडीत सहभागी होऊ नये असे फर्मान काढले.
२) यानंतर उच्च न्यायालयाने यासाठीची वयोमर्यदा कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असली पाहिजे. दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदाची वयाची १८ वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजेत.
३) २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी होता येणार नाही.
४) थरांवरच्या उंचीबाबतही आधी न्यायालयाने निर्बं.ध घातले होते, पण २०१७ मध्ये ते शिथील करण्यात आले
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम