Take a fresh look at your lifestyle.

मेजर ध्यानचंद यांना हुकमशाहा हिटलरने ऑफर दिली होती

खेलरत्न पुरस्काराचं नाव आता बदलण्यात आलं आहे. खेलरत्न पुरस्काराचं नाव आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याऐवजी मेजर ध्यानचंद पुरस्कार यांच्या नावानं असणार आहे.

0

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतीय खेळ जगातला सर्वात उच्च पुरस्कार आहे. १९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते.

याशिवाय आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपिचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या पुरस्कारासोबत २५ लाखांचे रोख बक्षीस आहे.

खेलरत्न पुरस्काराचं नाव आता बदलण्यात आलं आहे. खेलरत्न पुरस्काराचं नाव आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याऐवजी मेजर ध्यानचंद पुरस्कार यांच्या नावानं असणार आहे. त्यामुळे मेजर ध्यानचंद यांच्या नावाची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. भारतातील नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने असावं असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हिटलरने दिलेली ऑफर नाकारली

मेजर ध्यानचंद यांचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाचा तो सुवर्णकाळ होता. मेजर ध्यानचंद यांचा खेळ आवडल्यानं जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात मोठं पद देऊ केलं आणि जर्मनीसाठी हॉकी खेळण्यास सांगितलं.

ध्यानचंद त्यावेळी भारतीय लष्करात लान्स नायक या कनिष्ठ पदावर कार्यरत होते. पण जर्मन सैन्यातल्या मोठ्या पदाची ऑफर ध्यानचंद यांनी स्पष्टपणे नाकारली.

सामन्याच्या पंचाशी झाला होता वाद

ध्यानचंद यांचे हॉकीच्या खेळावरील प्रभुत्व किती होते याबद्दलचा एक किस्सा म्हणजे एकदा एका सामन्यात ध्यानचंद यांच्याकडून गोल होत नव्हते. त्यावेळेस त्या हॉकीच्या गोल पोस्टचे माप आणि अंतर यावरून ध्यानचंद यांचा सामन्याच्या पंचाशी वाद झाला.

अखेर जेव्हा हे मोजमाप करण्यात आले तेव्हा सर्वजण थक्क झाले. कारण ध्यानचंद यांचे म्हणणे अगदी बरोबर होते. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हॉकी गोल पोस्टची किमान रुंदी जितकी असायला हवी होती त्याचे उल्लंघन त्या सामन्यात झाले होते.

चेंडूवरील नियंत्रण होते अफलातून

ध्यानचंद यांचे हॉकी स्टिक आणि बॉलवरील नियंत्रण इतके जबरदस्त आणि अफलातून होते की एकदा नेदरलॅंड्सच्या हॉकी संघटनेने त्यांची हॉकी स्टिक मोडून तिची तपासणी केली होती.

त्यांना अशी शंका वाटत होती की लबाडीने ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक लपवण्यात आलेले आहे. मात्र त्यांना त्यांची चूक मान्य करावी लागली होती. ध्यानचंद यांचे चेंडूवरील नियंत्रण इतके अफलातून असायचे की चेंडू जणू काही त्यांच्या हॉकी स्टिकलाच चिकटून बसला आहे की काय असे वाटायचे.

जन्मदिवस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात 1991-92 मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये 1928 अमस्टर्डम, 1932 लॉस एंजेलिस आणि 1936 बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं

भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, अद्याप त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं नाही.

क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याला देण्यात आलेला आहे. सध्या जपानमध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं अतुलनीय कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं कांस्यपदक मिळवलं आहे. तर महिला संघाचं कांस्यपदक थोडक्यात हुकलं आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.