कधी काळी पवार साहेबांच्या गाडीमागे धावले आज राष्ट्रवादीचे खासदार आहेत
डॉ. अमोल कोल्हे हे मराठीतील एक नामवंत अभिनेते व राजकारणी आहेत. अभिनयाबरोबरच त्यांनी राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे. शिवसेना पक्षातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. शिवसेनेत ते उपनेते म्हणून काम करीत होते. तसेच 2014 विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षाची निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली होती.
पुणे जिल्ह्याचे ते शिवसेना संपर्क प्रमुख होते. 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून सलग तीन वेळा शिरूर लोकसभा मतदार संघात निवडून आलेले शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवून त्यांचा पराभव केला आणि डॉ. अमोल कोल्हे हे मराठीतील एक नामवंत अभिनेते व राजकारणी आहेत. अभिनयाबरोबरच त्यांनी राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे.
डॉक्टर, अभिनेता आणि आता राजकीय नेते, असा प्रवास असणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत बऱ्यापैकी महत्त्वाचं स्थान निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिकेत शिवरायांची भूमिका साकारल्याने महाराष्ट्रासह देशभरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये विशेष आकर्षण आहे. शिवाय, डॉ. कोल्हे यांची मुद्देसूद आणि स्पष्ट वक्तृत्व शैलीही खास आहे .
डॉ.अमोल कोल्हे यांच्या पत्नी अश्विनी याही डॉक्टर असून वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांना दोन मुलं असून आद्या आणि रुद्र अशी त्यांची नावे आहेत. आद्याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत काम देखील केले होते.
डॉ . अमोल कोल्हे यांची कारकीर्द
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘राजा शिव छत्रपती’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत काम केले होते. त्यांना या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आजवर अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
कधी काळी पवार साहेबांच्या गाडीमागे धावलो आज त्यांच्या पक्षात आलोय
शरद पवार यांच्या गाडीमागे आम्ही शेकडो तरूण धावायचो. जेणे करून त्यांची एक छबी तरी पाहता येईल. मात्र आज त्यांच्याच पक्षात प्रवेश करतोय. याचा एक वेगळाच आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असताना अभिनेते अमोल कोल्हे यांनी हि भावना व्यक्त केली होती .
डॉ. अमोल कोल्हेंचा राजकीय प्रवास
डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर कोल्हेंच्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. 19 मार्च 2014 रोजी कोल्हेंनी शिवसेनेचा भगवा हाती धरला होता. प्रत्यक्षात त्यावेळी ते मनसेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी कोल्हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. डॉ. अमोल कोल्हेंच्या वक्तृत्वशैलीमुळे श्रोते त्यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थित राहत. मात्र पुणे महापालिका निवडणुकांच्या वेळी कोल्हेंची जादू फारशी चालली नाही.अमोल कोल्हे यांनी 2015 पासून शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचं संपर्कप्रमुख पद सांभाळलं होतं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेची झालेली पिछेहाट पाहून या पराभवाची नैतिक जवाबदारी त्यांनी स्वीकारली होती.
डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती मालिकेतील शिवरायांच्या भूमिकेमुळे ते नावारुपाला आले. कलर्स वाहिनीवर वीर शिवाजी ही त्यांची हिंदी मालिकाही गाजली होती. छत्रपती संभाजी राजे मालिकेत सध्या डॉ. कोल्हे यांनी शंभूराजेंची भूमिका साकारली होती .
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम