विनोबांच्या आग्रहाखातर देशातील लाखो एकर जमीन दान करण्यात आली
आजघडीला जमीन हा किती महत्वाचा आणि संघर्षाचा मुद्दा आहे याची अनेकांना जाणीव असेल. वर्तमानपत्रात जमिनीच्या वादाच्या बातम्या वाचल्या कि याची जाणीव अजून गडद होत जाते. पण आपल्याच देशात एक अशी व्यक्ती होवून गेली. ज्याच्या शब्दावर देशातील लाखो एकर जमीन भूमिहीन लोकांना दान देण्यात आली. तो व्यक्ती म्हणजे विनोबा भावे
भूदान चळवळीची संकल्पना
१९४७ साली देश स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्यानंतरही देशातील अनेक भागात शांतता नव्हती. डाव्या चळवळीतील नेत्यांच्या नेतृत्वात तेलंगणा व आसपासच्या भागात सशस्त्र संघर्ष चालू होता. यामध्ये मुळात भूमिहीन लोकांची संख्या जास्त होती.
परिणामी एप्रिल १९५१ मध्ये विनोबा या लोकांना भेटण्यासाठी विनोबा तेलंगणात गेले. तुरुंगात जावून आंदोलनकर्त्या लोकांची भेट घेतली. १८ एप्रिल रोजी विनोबा नलगोंडा जिल्ह्यात पोचंपल्ली येथे पोहोचले.
विनोबांनी जेव्हा तिथल्या लोकांशी संवाद साधला, तेव्हा त्यांना समजले कि त्यांची मूळ मागणी जमीन होती. त्यांनी विनोबांना सांगितले की त्यांच्या ४० कुटुंबांना ८० एकर जमीन मिळाली तर ते त्यावर गुजारा करू शकतात.
त्यावेळी हि जमीन सरकारकडून घेण्याच्या विचाराला विनोबा सहमत नव्हते. त्यांनी त्याच गावातील गावकऱ्याकडे भूमिहीन हरिजनांसाठी जमीन मागितली. असे सांगितले जाते की यावर रामचंद्र रेड्डी नावाच्या शेतकऱ्यांने तातडीने १०० एकर जागेची ऑफर दिली.
या घटनेनंतर विनोबाला भूदान चळवळीची कल्पना आली. त्यानंतर विनोबांनी मोठ्या शेतकर्यांना जमिनीची मागणी करत पदयात्रा करायला सुरुवात केली.
यावेळी विनोबा म्हणत, “हवा आणि पाण्यासारखी जमीन देखील आहे. यावर सर्वांचाच हक्क आहे. तुम्ही मला तुमचा मुलगा मानून तुमच्या जमीनीचा एक सहावा हिस्सा द्या, ज्यावर भूमिहीन लोक वस्ती करु शकतात आणि शेती करुन स्वत:चा गुजारा करू शकतात.”
विनोबाच्या या आवाहनाचा मोठा परिणाम झाला. देशातील लोकांनी मोठ्या प्रमामात जमीनी दिल्या. पदयात्रा करत विनोबा जेव्हा पवनारला परत आले. तेव्हा हजारो एकरची जमीन बँक तयार होती.
लोकांचा प्रतिसाद पाहता प्रोत्साहित होऊन विनोबा उत्तर भारतातही गेले. कॉंग्रेसने विनोबाची चळवळ हाती घेतली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूदान मोठ्या प्रमाणात केले गेले. जमीन व्यवस्थित वाटप व्हावी म्हणून सरकारने भूदान कायदा देखील पास केला.
गाव दान करण्याची संकल्पना
यातुनच पुढे गाव दान देण्याची संकल्पना निर्माण झाली. यामध्ये, गावातील ७५ टक्के शेतकरी त्यांच्या जमिनी एकत्र करतील आणि त्यानंतर सर्वांमध्ये समान वाटप केले गेले. काळानुसार भूदान आणि ग्रामदान ही दोन्ही आंदोलने थंडावली. परंतु भूदान आंदोलनाने एक मोठी जमीन बँक मागे ठेवली. केंद्र सरकारच्या एका आकडेवारीनुसार देशभरात २२.९० लाख एकर जमीन भूदान चळवळीत दान देण्यात आली होती.
महात्मा गांधींचा वारसा
महात्मा गांधींच्या जीवनाचे दोन भाग होते. एक त्यांचे राजकारण आणि दुसरे अध्यात्म. गांधीचा राजकीय वारसा पंडित नेहरूंना देण्यात आला. त्यांच्या जीवनाचा दुसरा भाग अध्यात्म होता. सत्याग्रह हीच अध्यात्म ज्यापासून सत्याग्रह केला गेला होता. आणि जर कोणी गांधींच्या या वारशाचा वारस असेल तर तो विनोबा भावे.
१९४० मध्ये जेव्हा महात्मा गांधींनी असहकार चळवळीच्या माध्यमातून सत्याग्रह सुरु केला. तेव्हा त्यांनी विनोबाला पहिले सत्याग्रही म्हटले. विनोबा नंतर नेहरूंचा नंबर आला.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम