छोट्याश्या कंपनी पासून ते सर्वात विश्वासहार्य ब्रँड बनण्यापर्यंतचा अँपलचा प्रवास
तंत्रज्ञानाच्या या २१ व्या शतकात जवळपास प्रत्येकालाच मोबाईल व संगणकाची आवश्यकता भासते आहे. व जो कोणी हि दोन यंत्रे वापरतो त्या प्रत्येकाचे एक स्वप्न असते कि आपला संगणक व मोबाईल हा अँपल कंपनीचा असावा. अर्थात अँपल कंपनीने आपल्या ग्राहकांनी आपल्या प्रोडक्ट व सेवे द्वारे आकर्षित करून ठेवले आहे. मुख्यतः सुरक्षा व सर्वोत्तम ऑपरेटिंग सिस्टीम साठी अँपल या कंपनीला ओळखली जाते.
अँपलच्या लोगो पासून ते कंपनीच्या सर्वात मोठ्या ब्रँड बनण्या पर्यंतची एक उत्तम व प्रेरणादायी कहाणी आहे.
अँपल कंपनीची स्थापना १ एप्रिल १९७६ रोजी अँपल कॉम्पुटर इंक या नावाने स्टीव जॉब्स, स्टीव ओजनीयाक आणि रोनाल्ड वेन यांनी केली होती अनेक कंपन्या प्रमाणे या कंपनीची सुरुवात देखील एका गॅरेज मध्ये सुरु झाली.
मुख्यतः अमेरिकेतील क्लीरऑनियत स्तिथ असलेली हि कंपनी सुरुवातील वैक्तिक कॉम्पुटर (पर्सनल कॉम्पुटर) बनवत होती. अँपल १ हे पहिले संगणक बनवल्या नंतर संगणक बनवून विकायचा व्यवसाय आपण सुरु करायचा. असे या तिघांनी ठरवले. व अँपल २ बनवून ते अनेक गुंतवणूक दरांसमोर सादर केले. अनेकांनी यात पैसा गुंतवायला सुरुवात केली. बघता बघता अँपल एक ब्रँड बनले. सुरुवातीच्या काही वर्षातच या कंपनीने २ अब्ज रुपयांची कामे केली.
लोगोमागील प्रेरणादायी कहाणी
एप्पल चा पहिला लोगो हा आयझॅक न्यूटन यांचा फोटो होता. ज्यामध्ये आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते. हा लोगो रोनाल्ड यांनी बनवला होता मात्र रोनाल्ड यांनी कंपनीच्या स्थापने नंतर काही दिवसातच कंपनीची सात सोडल्याने दुसऱ्या लोगोचा शोध सुरु झाला व यातूनच प्रसिद्ध संगणक वैज्ञानिक एलन ट्यूरिंग यांचा विचार आला.
त्यावेळी अमेरिकेत होमोसेक्सुएलिटी एक अपराध मानल्या जात होता आणि एलन ट्यूरिंग हे त्यामध्ये अपराधी सापडले होते. आणि त्यांना शिक्षा म्हणून केमिकल ट्रीटमेंट देण्यात आली होती ज्यात सायनाइड इंजेक्टेड एप्पल खायला देण्यात आले होते. त्या एप्पल ला खाल्ल्यानंतर एलन चा मृत्यू झाला होता. आणि त्यांच्या पार्थिवाजवळ सापडलेलं हे खाल्लेलं सफरचंद त्यांना श्रद्धांजली म्हणून हा लोगो दिल्या गेला. अशा प्रकारे अँपलचा दुसरा लोगो बनवण्यात आला.
स्टीव जॉब्सच्या पुनरागमानंतर
१९८५ मध्ये स्टीव जॉब्सने अँपल कंपनीतून राजीनामा दिला. यानंतर काही वर्षे कंपनीने चांगली कमाई केली मात्र १९९६/९७ मध्ये कंपनीचा आलेख ढासळत चालला होता या दरम्यानच स्टीव जॉब्स आपलंच पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. यानंतर कंपनीने कधीच मागे वळून पहिले नाही. स्टीव जॉब्सच्या पुनरागमानंतर २ वर्षातच म्हणजे १९९९ साली अप्पलचा रेव्हेन्यू ६.१ बिलियन डॉलर एव्हडा झाला होता.
२००७ मध्ये अँपल कंपनीने मोबाईल बनवायला सुरुवात केली व अँपलचे नाव अँपल कॉम्पुटर इन्क वरून अँपल इंक करण्यात आले. अप्पलचा मोबाईल उत्पादनांचा प्रयोग हा एका क्रांतीच्या रूपात समोर आला. आय फोनला बाजारपेठेत भरभरून प्रतिसाद मिळाला. आय फोन किमतीच्या दृष्टिकोनातून महाग असला तरी प्रत्येक व्यक्ती सेक्युरिटी आणि चांगल्या ऑपरेटिंग सिस्टीम साठी अप्पलच्या मोबाईलला पसंती देतो.
२४ ऑगस्ट २०११ रोजी जॉब्सने अँपल कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून राजीनामा जाहीर केला. त्यांनी आपला राजीनामा अँपल च्या बोर्डस ऑफ मेंबर्स कडे दिला आणि त्याच्यासोबतच त्यांनी पुढील सीईओसाठी टीम कूकचे नाव दिले.
अँपल कंपनी २०१५ पर्यंत ७०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक किमतीची अमूल्य कंपनी बनली. सद्य्या अँपल कंपनीचे आय-फोन एसइ सर्वात लेटेस्ट मॉडेल बाजारपेठेत आहे. व ११ प्रो मॅक्स हे या पूर्वीचे मॉडेल होते. अँपल कंपनीच्या हार्डवेअर उत्पादनांमध्ये आयफोन स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअर, ऍपल वॉच स्मार्टवाच, ऍपल टीव्ही डिजिटल मीडिया प्लेयर आणि होमपॉड स्मार्ट स्पीकर यांचा समावेश आहे.
तसेच अँपल जगातील सर्वात मोठा संगीत विक्रेता म्हणून iTunes स्टोअर चालवते. व सॉफ्टवेअरमध्ये मॅक्रो व आयओएस ऑपरेटिंग सिस्टम, iTunes मीडिया प्लेयर, सफारी वेब ब्राउझर आणि आयलाईफ आणि आयवर्क सर्जनशीलता आणि उत्पादकता सुइट्स यांचा समावेश आहे. अँपल कंपनी सद्या मोबाईल कंपन्यांमध्ये ३ स्थानावर आहे. अशा प्रकारे अँपल कंपनीचा एका छोट्याश्या गॅरेज पासून सुरु झालेला प्रवास जगातील सर्वात विश्वासहार्य ब्रँड पर्यंत येऊन ठेपला आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम