भारताचा तिरंगा झेंडा कसा तयार झाला ?
15 ऑगस्ट 2020 रोजी स्वतंत्र भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन आपण साजरा करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे प्रथम लाल किल्ल्यावर आणि त्यानंतर प्रत्येक शाळा महाविद्यालये आणि प्रशासकीय इमारतीमध्ये अगदी दिमाखात हा तिरंगा फडकावला जाईल.
आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंग आहेत. केशरी, पांढरा आणि हिरवा म्हणूनच त्याला तिरंगा असही संबोधल जात. या रंगापैकी केशरी रंग हा शौर्य आणि त्यागाचे, मधला पांढरा रंग शांतीचा, त्यावर असलेले अशोकचक्र हे गतीच तर सर्वात खाली असलेला हिरवा रंग हे सुजलाम सुफलाम ऐश्वर्याच प्रतीक आहे.
पण हे सर्व तर आपण लहानपणी शाळेत बालपणापासून जाणताच, म्हणूनच या वेळी आपण राष्ट्र ध्वजाच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत.
- 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक कलकत्ता मध्ये फडकवलेला राष्ट्र ध्वज हा पहिला राष्ट्र ध्वज मानला जातो. लाल, पिवळा आणि हिरवा या रंगांचा समावेश होता. यापैकी लाल पाट्यावर चंद्र – सूर्य, पिवळावर वंदे मातरम हे शब्द तर हिरवावर 8 कमळ असे त्याचे स्वरुप होते.
- दुसरा ध्वज हा 1907 साली मैडम कामा यांच्याकडून पॅरिस मध्ये फडकविण्यात आला होता. पहिल्या ध्वज प्रमाणेच याची रचना होती. याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पिवळा तर खालचा केशरी होता. हिरवा पट्टावर 8 तारे होते, जे आठ प्रांतांचे प्रतीक मानले जाते. बर्बीन मध्ये झालेल्या समाजवादी परिषदेतही हा ध्वज प्रदर्शित करण्यात आला होता.
- तिसरा ध्वज हा 1917 मध्ये डॉ. एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होमरूळ चळवळी दरम्यान फडकवला. आकाशात दिसणार्या सप्तर्षी च्या आकृती प्रमाणेच झेंड्यावरही काढले होते. झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एकाआड एक पद्धतीने होते.
- 1921 मध्ये विजय वाडा येथे अखिल भारतीय काँग्रेस कमीटीचे अधिवेशन झाले होते. येते आंध्रप्रदेश च्या पिंगली व्यकंय्या या युवकाने महात्मा गांधींना झेंडा दिला. यात हिंदू आणि मुस्लिम यांचे प्रतिनिधित्व करणारे लाल व हिरवा असे दोन रंग होते. उर्वरीत समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून त्यात पांढर्या रंग आणि राष्ट्रा च्या प्रगतीचे प्रतीक म्हणून चरखा ही समाविष्ट केला गेला.
- 1931 मध्ये हाच तिरंगा ध्वज आपला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकार ण्यासाठी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावात तिरंग्याचा धर्माशी असलेला संबंध काढून टाकण्यात आला.
- 1931 साली स्वीकृत झालेला तिरंग्यात फक्त एक बदल केला गेला. चरखा च्या ऐवजी अशोकचक्र बदलून 1947 च्या घटना समितीत हा बदल स्विकारला गेला.
- शर्मिष्ठा डोंगरे
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम